समाजकार्यामुळे प्रभाग सात मधुन नदीम सय्यद प्रबळ दावेदार
जामखेड नगरपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम पेटला असून आचारसंहिता देखील लागली आहे. त्यातच निवडणुकीच्या तारखा देखील जाहीर असल्याने इच्छुक उमेदवार निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. याच आनुशंगाने प्रभाग सात मधुन सामाजिक क्षेत्रात पुढे असणारे नदीम बाबामिया सय्यद हे नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी प्रबळ दावेदार समजले जात आहेत.
सध्या प्रभाग सात मधुन नदीम सय्यद यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. सेवाभावी कार्यशैली, लोकांमधील आत्मीयता आणि सततच्या सामाजिक सहभागामुळे नदीम सय्यद लोकप्रिय होताना दिसत आहेत.
गेल्या तीन दशकांपासून फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर तसेच प्रामाणिक आणि जनसामान्यांच्या बाजूने उभे राहणारे कार्यकर्ते म्हणून नदीम सय्यद यांचे उल्लेखनीय काम आहे. प्रभाग सात मध्ये अनेक समस्या आहेत. काही नागरिकांना कुठल्याही योजनेचे वेळेवर व पुरेसे पाणी मिळत नाही, तसेच प्रभागामधील रस्त्याची दुरावस्था झाली आहे.
प्रभागामधील सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटाराची देखील दुरावस्था झाली आहे. आपल्या प्रभागामध्ये कचऱ्याचे नियोजन नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरासह प्रभागात मोकाट जनावरे आणि मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला यामुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अनेक ठिकाणी प्रभागात रात्रीच्या वेळी अंधार असल्याने प्रभागात विजेचे दिवे बसवून प्रभाग प्रकाशमय करायचा आहे. यासाठी प्रभाग सात मधुन जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी नदीम सय्यद हे निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत.
नागरिकांनी नदीम सय्यद यांच्या पारठीशी उभे राहून साथ द्यावी असे आवाहन नदीम सय्यद व मित्र परिवाराने केले आहे. सय्यद यांना स्थानिक नागरिकांकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे प्रभाग क्रमांक सात मध्ये नदीम सय्यद हा एक सक्षम, सुशिक्षित आणि जनतेच्या मनातला चेहरा म्हणून सध्या उदयास येत आहे.