रोहित दादांचे व्हिजन टक्केवारी चे नाही तर विकासाचे आहे – अर्चनाताई संपत राळेभात पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या अर्चनाताई राळेभात पहा

0
596

जामखेड न्युज—–

रोहित दादांचे व्हिजन टक्केवारी चे नाही तर विकासाचे आहे – अर्चनाताई संपत राळेभात

पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या अर्चनाताई राळेभात पहा

आमदार रोहित पवार यांचे विकासाचे व्हिजन आहे. टक्केवारीचे नाही. आणि आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली जामखेड शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी नगराध्यक्ष पदाची संधी मिळाल्यास निश्चित रस्ते, वीज, पाणी या अडचणी सोडविल्या जातील व एक सुंदर जामखेड करू असे अर्चनाताई संपत राळेभात यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवार अर्चनाताई संपत राळेभात यांनी आज पत्रकार परिषद घेत आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे व्हिजन पुढे नेणार आहे. व जामखेड चा चेहरामोहरा बदलणार आहे.

सध्या जामखेड शहरात अनेक समस्या आहेत. निट रस्ते नाहीत अनेक वाड्या वस्त्यावर जाण्यासाठी रस्ते नाहीत. शाळेतील मुलांचे, लोकांचे हाल होत आहेत. तसेच शहराला दहा दिवसाआड पाणी मिळत आहे.

दहा दिवस पाणी टिकत नाही. खराब पाणी नागरिकांना प्यावे लागले. तसेच लाइटची सुविधा अनेक ठिकाणी नाही. या सर्व समस्या सोडविण्यासाठी जर नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली तर सोडविल्या जातील असे सांगितले.

यावेळी बोलताना पुढे म्हणाल्या की, मी सतरा वर्षापासून सामाजिक काम करत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला तेव्हा आमदार रोहित पवार यांचे विकासाचे व्हिजन समजले. जामखेड चे ग्रामदैवत नागेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी नागरिक घाबरत होते. आमदार रोहित पवार यांनी परिसरात रस्ते, नानानाणी पार्क केले आज नागेश्वर मंदिर पर्यटन केंद्र झाले आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांच्या कडे खरोखरच व्हिजन आहे. त्यामुळे जामखेड शहरात सुसज्ज इमारती दिसत आहेत.

तसेच आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा ताई पवार यांचे बचत गटाच्या माध्यमातून खुप मोठे काम आहे. अनेक महिलांना स्वतः च्या पायावर उभे करत उद्योग व्यवसायात सक्षम बनवले आहे.

आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे. पक्षाकडून जर संधी मिळाली तर निश्चित शहराचा विकास करून चेहरामोहरा बदलणार असे अर्चनाताई संपत राळेभात यांनी सांगितले.

नुकतीच आचारसंहिता जाहीर झाली व इच्छुक उमेदवाराची एकच धांदल उडाली आहे. आपापल्या परीने जनतेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आज पत्रकार परिषद घेत अर्चनाताई संपत राळेभात यांनी आपले व्हिजन सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here