अहोरात्र जनसेवेत असणारा शांत संयमी सर्वसमावेशक चेहरा प्रकाश काळे
प्रभाग पाच मधील जनतेची प्रकाश काळे यांना अधिक पसंती
जामखेडच्या राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात काम करताना आदिवासी पारधी समाजाच्या उन्नतीसाठी तसेच इतर समाजातील गोरगरीब व गरजू नागरिकांसाठी विविध शासकीय दाखले, आदिवासींना खावटी कर्ज, मोठ्या प्रमाणात घरकुले, तसेच समाजातील मुलांच्या पशैक्षणिक जागृतीसाठी विविध उपक्रम राबविले. या बरोबरच आपल्या बचत गटाच्या माध्यमातून धान्य दुकान चालवताना अनेकांचा अंत्योदय व प्राधान्य (कुटुंब योजनेत सामावेश करून त्यांना धान्य मिळवून देण्याचे काम केले. तसेच इतर सामाजिक कामांबरोबरच कोरोना काळातही वेगवेगळ्या पध्दतीने केलेल्या सहकार्यामुळे संपूर्ण शहरात आदिवासी पारधी समाजातील एक सुशिक्षित कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण झाली. त्याच पार्श्वभूमीवर जामखेड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक पाच मधे पडलेल्या अनुसूचित जमाती या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून आमचे नेते कर्जत जामखेडच लोकप्रिय आमदार रोहित (दादा) पवार हे मला संधी देतील असा ठाम विश्वास वाटतो. असे प्रकाश काळे यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.
जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीचे वारे जोर धरू लागले असून, प्रभाग क्रमांक ५ (अनुसूचित जमाती आरक्षित) मधून प्रकाश (भाऊ) काळे हे नाव प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत आले आहेत कारण ते अनुसूचित जमातीसाठी अहोरात्र काम करत आहेत. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच राजेंद्र कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली ते निवडणुकीत उतरणार आहेत.
प्रकाश भाऊ काळे समाजसेवेच्या क्षेत्रात विशेष ओळखले जातात. ते अनेक वर्षांपासून “आदिवासी पारधी समाज शिक्षण व बालसंस्कार संस्था” या संस्थेत कार्यरत असून, पारधी व भिल्ल समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी बालसंस्कार वर्ग सुरु केले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे या समाजातील मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण झाली आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित (दादा) पवार यांच्या सहकार्याने त्यांनी पारधी समाजातील कुटुंबांना पत्र्याचे वाटप केले, तसेच घरकुल योजनेअंतर्गत शंभरहून अधिक कुटुंबांना लाभ मिळवून दिला आहे. याशिवाय त्यांनी सतराशेहून अधिक आदिवासी नागरिकांना जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी तहसील, प्रांत व जिल्हाधिकारी कार्यालयात पाठपुरावा केला आहे.
आदिवासी महिलांसाठी बचतगट उभारून त्यांना आर्थिक सबली करणाकडे नेले आहे. प्रकाश (भाऊ) काळे यांनी नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ मधून उमेदवारी दाखल करण्याची तयारी सुरु केली असून, अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याची समस्या, स्वच्छता, वीजप्रकाश या मूलभूत सोयी-सुविधांचा विकास हे त्यांच्या प्राधान्यक्रमात राहणार आहे. “या भागातील गोरगरीब आणि वंचित वर्गाचे जीवनमान उंचावण्यासाठी शासकीय योजनांचा योग्य वापर करून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विकास पोचवण्याचा प्रयत्न करणार,” असे प्रकाश भाऊ काळे यांनी सांगितले.
स्थानिक नागरिकांकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे प्रभाग क्रमांक ५ मध्ये प्रकाश भाऊ काळे हा एक सक्षम, सुशिक्षित आणि जनतेच्या मनातला चेहरा म्हणून उदयास येत आहे. प्रकाश काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून अगदी प्रतीकुल परिस्थितीत तळमळीने काम करत आहेत. विरोधी पक्षात असताना पक्षाचे काम जनसामान्यांमध्ये ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या त्यागाचे फलीत पक्ष त्यांना उमेदवारीच्या रुपात देईल अशी अपेक्षा जनतेमधून होत आहे.