जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
तालुक्यातील कोल्हेवाडी येथील तरूण कार्यकर्ते डॉ. मंगेश कोल्हे व श्रीकृष्ण कोल्हे यांनी आपला वाढदिवस विविध सामजिक उपक्रम राबवून साजरा केला स्नेह सावली बालगृह बीड येथे किराणा किट व खाऊ वाटप तसेच विष्णवेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी मदत व परिसरात शंभर वडाच्या झाडाची लागवड करून साजरा केला.
पाश्चात्त्य पद्धतीचा प्रभाव आपल्या संस्कृतीबरोबरच दैनंदिन जीवनात अगदी वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीवरही पडला आहे. वाढदिवसाला औक्षण करण्याची पद्धत बदलून त्याची जागा केक कापणे आणि मेणबत्ती फुंकणे यांसारख्या पाश्चात्त्य पद्धतींनी घेतली. मात्र या परंपरेला फाटा देत डॉक्टर मंगेश कोल्हे व श्रीकृष्ण कोल्हे यांच्या वाढदिवस विविध सामजिक कार्य करून साजरा करण्यात आला..
कोल्हेवाडी गावचे युवा तरुण डॉ.मंगेश कोल्हे व श्रीकृष्ण कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेह सावली बालगृह बीड येथे खाऊ वाटप व किराणा किट देणगी दिली.तसेच सारोळा येथे विष्णवेश्वर मंदिर जीर्णोद्धारासाठी अकरा हजार एकशे अकरा रुपये ची देणगी देण्यात आली. व कोल्हेवाडी येथे शंभर मोठी वडाच्या वृक्षारोपण करण्यात आले.. अशाप्रकारे विविध समाजउपयोगी कामे करून अनोखा उपक्रम राबवण्यात आले आली त्यावेळी उपस्थित देशसेवक आण्णासाहेब जाधव बोलताना म्हणाले.सुशिक्षित होणे म्हणजे फक्त पाठय़पुस्तकातील प्रकरणांची घोकंपट्टी करणे नसून आपल्या समाजातील विविध घटकांशी बांधिलकी असणे गरजेचे आहे.आणि डॉ. मंगेश कोल्हे, श्रीकृष्ण कोल्हे तसेंच कोल्हेवाडीतील सर्व तरुण हे समाजाच्या कामासाठी सतत पुढेच असतात.
यावेळी उपस्थित सावली चे संचालक निलेश आप्पा मोहिते ,माजी सैनिक अंगद कोल्हे,एडवोकेट किरण कोल्हे, ब्रम्हा कोल्हे, संतोष कोल्हे, सोमराज कोल्हे,सागर कोल्हे उपस्थित होते..










