ख्रिस्तीसमाज बांधवांच्या दफनभूमीसाठी जागा मिळावी

0
289
जामखेड प्रतिनिधी 
         जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
जामखेड मधील ख्रिस्तीसमाज बांधवांच्या दफनभूमीसाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी जामखेड नगरपरिषदचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, तहसीलदार नवनाथ लांडगे आणि कर्जत जामखेडचे आमदार साहेब रोहित दादा पवार यांना निवेदन देण्यात आले.
         जामखेड शहरात तसेच तालुक्यामध्ये  जवळपास दोनशे ते अडीचशे ख्रिस्ती कुटुंब राहत आहेत त्यांना त्यांची हक्काची दफनभूमी नव्हती. या कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक कुटुंबामध्ये मयत झाल्या. दफनविधीसाठी जागा उपलब्ध नसल्याने मयतांची हेळसांड झाली. तसेच ख्रिस्ती समाज बांधवांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. म्हणून, स्मशानभूमीसाठी जागा  उपलब्ध करून सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी आमदार रोहित पवार, तहसीलदार नवनाथ लांडगे तसेच मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांना निवेदना मार्फत करण्यात आली. यावेळी तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांनी तत्परतेने योजना करून लवकरात लवकर दफनभूमी बांधून देण्याचे ठोस आश्वासन दिले आहे.
यावेळी ख्रिश्चन सिमेट्री कमिटी मधील योसेफ पंडित, सुरेश निमगावकर, संतोष देठे, प्रकाश त्रिभुवन, मेषक गुरम, प्रकाश खंडागळे,याकोब आरोळे विनित पंडित उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here