Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या दिघोळ मध्ये आबासाहेब सामाजिक प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून हनुमान मंदिर व स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण...

दिघोळ मध्ये आबासाहेब सामाजिक प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून हनुमान मंदिर व स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण व पथदिवे लोकार्पण सोहळा संपन्न

0
67

जामखेड न्युज——-

दिघोळ मध्ये आबासाहेब सामाजिक प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून हनुमान मंदिर व स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण व पथदिवे लोकार्पण सोहळा संपन्न

सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असणारे आबासाहेब प्रतिष्ठान मार्फत पदरमोड करत सुरज रसाळ व धीरज रसाळ यांनी दिघोळ येथे हनुमान मंदिर व स्मशानभुमी परिसरात वृक्षारोपण केले व पथदिवे लावून त्याचे संतांच्या व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण केले.

यावेळी महालिंग महाराज नगरे, ज्ञानेश्वर महाराज नगरे, प्रसाद महाराज गीते, हरीआबा गीते महाराज,
केशव (आण्णा) वनवे, संजिवनी पाटील, मनोज राजगुरू, सरपंच सविता संतोष शिंदे, उपसरपंच दशरथ राजगुरू, बाजीराव गोपाळघरे, धीरज रसाळ, सुरज रसाळ, वैजिनाथ गीते, मच्छिंद्र गीते, आत्माराम महाराज गीते सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना ज्ञानेश्वर महाराज नगरे म्हणाले की, सखारामबाबा, गीते बाबा यांच्या आशिर्वादाने
सामाजिक सेवेचा वारसा आबासाहेब प्रतिष्ठान च्या माध्यमातून सुरज व धीरज चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत. आज मंदिर व स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण तसेच पथदिवे लोकार्पण संपन्न होत आहे. रसाळ बंधूंनी एक चांगला संदेश दिला आहे. घरात दारात दिवे लावण्यापेक्षा लोकांना प्रकाश देण्याचे काम केले आहे. त्यांना शुभेच्छा दिल्या.

दिघोळ माळेवाडी ग्रामपंचायत व पंचक्रोशी मध्ये सतत आबासाहेब सामाजिक प्रतिष्ठान मार्फत सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याच उपक्रमापैकी आज दिवाळीचे औचित्य साधून एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला हनुमान मंदिर परिसर ते स्मशानभूमी परिसरापर्यंत पथ दिवे व वृक्ष लागवड करण्यात आली.

सर्व परिचित असलेले दिघोळ माळेवाडीची माजी सरपंच कै. रामभाऊ रसाळ यांच्या निधनानंतर त्यांची दोन मुले सुरज आणि धीरज यांनी आबासाहेब सामाजिक प्रतिष्ठान उभे केले व त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाच वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवणे चालू केले त्यांच्या वडिलांचा समाजकारणाचा व राजकारणाचा वारसा चांगल्या पद्धतीने मुले सांभाळत आहेत.


या कार्यक्रमाप्रसंगी सुरज रसाळ यांनी इथून पुढे आबासाहेब सामाजिक प्रतिष्ठान मार्फत असे सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील अशी ग्वाही दिली.

यावेळी उपसरपंच दशरथ राजगुरू, तंटामुक्ती अध्यक्ष धीरज रसाळ, वसंत रसाळ, नानासाहेब गीते, नागनाथ उमाप, संतोष शिंदे, रविकिरण गायकवाड, हनुमान फुने, बळीराम ढवळे, बाळासाहेब झगडे, वैजनाथ गीते, गहिनीनाथ विटकर, राहुल टाके, कांतीलाल जंगम, रामहरी आवारे, अंकुश वारे, बिभीषण पारखे, ज्ञानेश्वर रंधवे, सदाशिव हिंगमिरे, नारायण दगडे, तय्यब शेख, बापू दगडे सह आबासाहेब प्रतिष्ठानचे सर्व सहकारी आणि दिघोळ ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!