मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला पाठिंब्यासाठी उद्या पाटोदा तालुका बंद

0
463

जामखेड न्युज—–

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला पाठिंब्यासाठी उद्या पाटोदा तालुका बंद

मराठा संघर्ष योध्दे मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषण करत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या मंगळवारी दि. २ रोजी पाटोदा तालुका बंद ठेवण्यात येणार आहे.

मला काहीही नको, फक्त माझ्या समाजाला आरक्षण हवे असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकलं आहे. मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम असून त्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. मंत्रिमंडळ उपसमितीच्या मॅरेथॉन बैठका सुरु आहेत.

पण मनोज जरांगे पाटील यांना समाधानकारक तोडगा अद्याप मिळू शकलेला नाही, त्यामुळे चौथ्या दिवशीही आंदोलन कायम राहणार आहे. राज्यात सध्या पावसाने ब्रेक घेतला आहे.

पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. पण पुढील काही दिवस मुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील बहुतांश भागांत यलो अलर्ट जारी करण्यात आला.

राज्यातील कानाकोपऱ्यातून मुंबई तील बांधवांसाठी सिधा भाकरी, ठेचा, चटणी, लोणचं, फळे, फरसाण, बिस्किटे असे वाहने भरून जात आहेत. आणि तालुके बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here