जिल्हाधिकारी खर्डा शहरात, किल्ल्यासाठी 1 कोटी 20 लाख रुपयांचा गेलेला निधी परत मिळावा दत्तराज पवार यांची मागणी
अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी काल अचानक खर्डा शहराला अचानक भेट दिली. यानंतर सिताराम गडावर जाऊन दर्शन घेतले. यावेळी विविध प्रलंबित प्रश्नावर चर्चा केली.
मराठे व निजाम यांच्यातील शेवटची लढाई झालेले ऐतिहासिक ठिकाण तसेच इतिहासाच्या पाऊलखुणा जिवंत ठेवणारा किल्ला याचे योग्य प्रकारे जतन होणे आवश्यक आहे यासाठी 1 कोटी 20 लाख रुपयांचा गेलेला निधी परत मिळावा दत्तराज पवार यांनी मागणी केली.
याबाबत माहिती अशी की, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी खर्डा शहराला शासकीय नियोजित धावती भेट दिली. त्यानंतर क्षेत्र सिताराम गडावर त्यांनी दर्शन घेऊन येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास भेट दिली.
त्यावेळी गडाचे महंत हभप महालिंग महाराज यांनी त्यांचा सत्कार केला तसेच सरपंच संजीवनी पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर,युवराज आबा गोलेकर, पोपट भुते शिंदे सर यांनीही ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार केला.
त्यानंतर त्यांचा ताफा ऐतिहासिक खर्डा किल्ल्याच्या भेटीसाठी रवाना झाला तेथे त्यांनी येथील विकास कामांची माहिती घेतली यावेळी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार दत्तराज पवार यांनी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना प्रश्न उपस्थित केला की,साहेब किल्ल्यासाठी भेट देणाऱ्या पर्यटकांना पुरातत्त्व खात्याने 1 कोटी 20 लाख रुपयांचा निधी रेस्ट हाऊस,कॅन्टींग व सुलभ शौचालयासाठी दिला होता त्याचे टेंडर ही पास होऊन प्रत्यक्षात कामही सुरू झाले होते.
परंतु काही संघटनेच्या विनाकारण विरोधानंतर हे काम थांबविण्यात आले आहे.त्यानंतर हे काम सुरू व्हावे यासाठी अनेक वादावादी झाल्या परंतु नंतर हा एवढा मोठा आलेला निधी परत गेला असल्याने पर्यटकांना आजही अनेक सूविधाना मुकावे लागत आहे,असा मुद्दा त्यांनी जिल्हाधिकारीडॉ. पंकज आशिया साहेब यांच्या निदर्शनास आणून दिला व गेलेला निधी परत मिळावा अशी मागणी पवार यांनी केली त्याचवेळी जिल्हाधिकारी साहेब यांनी पुन्हा सुधारित आराखडा तयार करून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मार्केट कमिटीचे संचालक वैजीनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे, महेश दिंडोरे,राजू मोरे,भास्कर गोपाळघरे,बाळासाहेब गीते,रामहरी गोपाळघरे,राजेंद्र गोलेकर,बाळासाहेब गोपाळघरे,पत्रकार संतोष थोरात, धनसिंग साळुंखे ले,गणेश नेहरकर, किरण जाधव,सार्वजनिक बांधकाम खात्याचे सुतार साहेब,कामगार तलाठी विकास मोराळे,ग्रामपंचायत अधिकारी बबन बहिर भाऊसाहेब इत्यादी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी सहाय्य पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.