उघड्यावरील हागणदारीमुक्ती साठी साकतचे ग्रामस्थ करणार उपोषण, प्रशासन काय कारवाई करणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष

0
630

जामखेड न्युज—–

उघड्यावरील हागणदारीमुक्ती साठी साकतचे ग्रामस्थ करणार उपोषण, प्रशासन काय कारवाई करणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष

अहिल्यानगर जिल्हा हागणदारीमुक्त म्हणून गावोगावी फलक लावलेले आहेत पण हे फक्त कागदोपत्रीच आहे प्रत्यक्षात गावोगावी अनेक ठिकाणी उघड्यावर नागरिक शौचास बसतात यामुळे हागणदारीमुक्ती चा नारा फोल ठरलेला आहे. गाव हागणदारीमुक्त करावे म्हणून साकतचे ग्रामस्थ उपोषण करणार आहेत तसे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांना दिले आहे. यामुळे आता उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

जामखेड तालुक्यातील साकत हे गाव राजकीय दृष्ट्या प्रगत समजले जाते. पण जामखेड पाटोदा रस्ता, साकत कोल्हेवाडी रस्ता, श्री साकेश्वर विद्यालय रस्ता पाण्याची टाकी परिसर, खाजगी शेत
या ठिकाणी अनेक नागरिक उघड्यावर शौचास बसतात यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. व रोगराईचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. तसेच शाळेत मुले मुली जातात तेव्हा काही लोक रस्त्याच्या कडेला शौचास बसलेले असतात. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर भांडण्यास सुरूवात करतात.

उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांनी शासनाच्या शौचालयाचे बारा हजार रुपये अनुदान घेतलेले आहे तसेच अनेक शासकीय योजनांचा लाभ घेतात. प्रशासनाने ताबडतोब उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कडक कारवाई करत शासकीय अनुदाने बंद करावित व उघड्यावरील हागणदारी बंद करावी अन्यथा उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदनावर भाऊसाहेब सानप, केशव वराट, निशिकांत वराट, हनुमंत सानप, वराट शिवाजी, आधिक सरोदे, केशव मोरे, शिवाजी लहाने, हनुमंत वराट, सुरेश वराट, रामदास वराट, गोरख वराट, उत्तरेश्वर वराट, विष्णू वराट, हरीभाऊ मुरूमकर, पोपट लहाने, दत्ता वराट सह अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत. तसेच ग्रामसभेत ही हा विषय घेण्यात आला होता.

निवेदनात म्हटले आहे की, साकत या गावामध्ये बहुतेक लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला असून सदर लाभार्ती हे पाटोदा जामखेड रोड श्री साकेश्वर विद्यालय तसेच पाण्याची टाकीजवळ साकत कोल्हेवाडी रोडवर तसेच गावाजवळ खाजगी शेतकार्याच्या पिकामध्ये शौचास बसतात. यामुळे शाळकरी मुले रोडवरून जाणारे लोक यांना त्रास होत आहे.

तरी सदरील उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर
योग्य कार्यवाही करावी. तसेच त्यांची लाडकी बहिण, पी एमम किसान, ग्रामपंच्यातमधून मिळणारे दाखले, उतारे ई सेवा बंद करण्यात यावे. कार्यवाही न झाल्यास बेमुदत उपोषण केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. यामुळे आता प्रशासन काय कारवाई करणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here