विकास (तात्या) राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड करांनी अनुभवला प्रचंड गर्दीत बैलगाडा शर्यतीचा थरार, सुमारे तिनशे गाड्यांचा सहभाग शंभू व हिरा ठरले पहिल्या बक्षिसाचे मानकरी
विकास (तात्या) राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्तजामखेड करांनी अनुभवला प्रचंड गर्दीत बैलगाडा शर्यतीचा थरार, सुमारे तिनशे गाड्यांचा सहभाग
शंभू व हिरा ठरले पहिल्या बक्षिसाचे मानकरी
एकेकाळी नाचगाण्यांसाठी राज्यभरात प्रसिद्ध असणारी जामखेडची नागपंचमी आता चाळा ऐवजी टाळ याचबरोबर कुस्त्यांचा हगामा आणि या वर्षी पासून भव्य दिव्य अशी बैलगाडा शर्यत यामुळे यापुढे जामखेड ची नागपंचमी बैलगाडा शर्यतीसाठी ओळखली जाईल असे नेटके नियोजन करण्यात आले होते, सुमारे तिनशे बैलगाड्या शर्यतीसाठी सहभागी झाल्या होत्या. हे पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली होती. जामखेड करांना बैलगाडा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी मिळाला.
जामखेड मध्ये प्रथमच ग्रामदैवत श्री नागेश्वर यात्रेनिमित्त नागेश्वराच्या पावनभुमीत जामखेड नगरपरिषदेचे प्रथम नगराध्यक्ष मा. विकास राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त “एक आदत, एक बैल” भव्य अशा बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
तसा जामखेडकरांना बैलगाडा शर्यत ही स्पर्धा नवखी आहे नागपंचमी निमीत्ताने जामखेड शहरात धार्मिक,सांस्कृतिक, कुस्ती मैदान, आनंदनगरी यांचे आयोजन होत असते. धर्मवीर युवा मंचाच्या वतीने आणखी एक स्तुत्य आसा बैलगाडा शर्यत स्पर्धेचे आयोजन करून या ऊत्सवात भर घातली होती.
प्रथम नगराध्यक्ष विकास तात्या राळेभात यांचा शंभू व हिरा हे पहिले मानकरी दुसरे मानकरी अण्णासाहेब राठोड बजरंग ग्रुप अंबड तोफिक ड्रायव्हर यांचा बजरंग डॉन खंड्या डॉन हा दुसरा मानकरी तसेच यावेळी विकास तात्या राळेभात यांना मनोज जरांगे पाटील यांनीही मोबाईलवरून शुभेच्छा दिल्या तसेच आष्टी पाटोद्याचे आमदार सुरेश आण्णा धस यांनीही मोबाईलवरून शुभेच्छा दिल्या.
यावेळी कर्जत जामखेड चे लाडके आमदार रोहित दादा पवार यांनीही बैलगाडी शर्यत येथे भेट घेऊन विकास तात्या राळेभात यांना दिल्या शुभेच्छा यावेळी श्याम भैय्या धस, अमोल राजे शिंदे, योगेश राजे जाधव यांनीही दिल्या शुभेच्छा तसेच प्रथम बक्षीस केतन( दादा) राळेभात पाटील 51 हजार द्वितीय बक्षीस विकासशेठ कस्तुरे व अमितशेठ बोथरा 31 हजार तर तृतीय बक्षीस गुलशन अंधारे 21000 हजार यांनी दिले.विकास तात्या राळेभात मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आयोजन यावेळी दादासाहेब नागरगोजे, डॉ. अविनाश जगताप, भाऊराव जगताप,योगेश सुरवसे, अमोल काटकर, सुधिर सागडे यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच झेंडा पंच म्हणून -प्रभु भैय्या नगरे (करमाळा)व समालोचक पंच -महाराष्ट्राचा बुलंद आवाज मारुतीदादा जंजीरे – रुग्णवाहीका सौजन्य -विशाल ढवळे – साऊंड सौजन्य -महाराजा Dj, जामखेड तर सुत्रसंचालन दादासाहेब नागरगोजे केले तर अमोल खरात यांनी मानले आभार यावेळी मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.