पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार – पांडुरंग माने
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह व असभ्य भाषेत पोस्ट व कमेंट करणाऱ्या सुनील गोपाळराव उभे यांच्या वर कडक कायदेशीर कारवाई करावी अटक करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराजा यशवंतराव होळकर राज्यभिषेक सोहळा समितीचे सदस्य पांडुरंग माने यांनी दिला आहे.
समाजकंटक सुनील गोपाळराव उभे यांच्या अहिल्यादेवी होळकर यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट विरोधात कडक कारवाई साठी आज दिनांक १९ जुलै रोजी जामखेड पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना पांडुरंग माने म्हणाले की, “अहिल्यादेवी होळकर या समस्त जनतेच्या श्रद्धास्थान आहेत. त्यांच्याविषयी केलेली ही पोस्ट संपूर्ण समाजाच्या अस्मितेवर घाव घालणारी आहे.
अहिल्यादेवींवर बोलणाऱ्यांना समाज धडा शिकवेल, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या, जातीयतेला खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तीवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
निवेदन देतेवेळी महाराजा यशवंतराव होळकर राज्यभिषेक सोहळा समितीचे सदस्य पांडुरंग माने,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रकाश काळे, उमेश राळेभात, नितीन राऊत, विनोद टकले, गणेश खराडे, संतोष खरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.