जामखेड मध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या अपुर्ण कामामुळे दोन वाहनांचा भीषण अपघात, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या सतर्कतेमुळे जखमीचे वाचले प्राण

0
1376

जामखेड न्युज—–

जामखेड मध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या अपुर्ण कामामुळे दोन वाहनांचा भीषण अपघात, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या सतर्कतेमुळे जखमीचे वाचले प्राण

 

जामखेड शहराला जोडणाऱ्या महामार्गाच्या काम करण्याची मुदत संपुणही काम अपुर्णच आहे. जागोजागी खटक्या यामुळे वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यातच भीषण अपघात होत आहेत. कित्येक दिवसांपासून पंचदेवालय समोरील त्रिकोणाजवळ खड्डा तसाच आहे. यामुळे अनेक गाड्याचे अपघात होतात.


शहरातील आणि कर्जत रोड – नगर रोड- खर्डा रोड- बीड रोड प्रत्येक ठिकाणी खटक्या आणि खड्डे असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.


जामखेड कर्जत रोडवरील के.जी.एन. कारखान्या समोर दोन आयशर समोर समोर धडकून मोठा अपघात झाला यामध्ये पिंपरनइ (लिंबागणेश )बीड येथील रहिवासी पवन सोन्याबापु कापसे वय २६ हा जबर जखमी झाला असून त्याचा पाय फॅक्चर झाला आहे घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना बजरंग सरडे यांनी दिली.


दोन्ही गाड्या आयशर असल्यामुळे जोरात अपघात झाला MH 23 AU 4568
MH 04 NH 2380 ASHA AAHE
गुरुवार दिनांक १९/६/२०२५ रोजी
रात्री ७:४५ अपघात घडल्याबरोबर कोठारी यांना फोनवर माहिती दिली कोठारी यांनी स्वतः आपली रुग्णवाहिका घेऊन पाचच मिनिटात घटनास्थळी दाखल झाले अपघातात जखमी चे पाय गाडीच्या स्टेरिंगच्या खालच्या बाजूला अडकले होते संबंधित लोकांनी त्यास बाहेर काढले असता कोठारी यांनी ताबडतोब दवाखान्यात दाखल केले.

आहे त्याच्या उजवा पाय हा फॅक्चर झाला असून तोंडाला लागले आहे उपचार चालू आहेत घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी सरोदे पोलीस कॉन्स्टेबल यांना दिली असून पुढील तपास चालू आहे. 

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले जामखेड शहरात आणि शहराच्या बाहेर रोडचे काम चालू असून प्रत्येक टर्नला मोठे मोठे खड्डे झाले आहेत खटक्या पडल्या आहेत.

त्यामुळे गाड्या जोर जोरात आढळतात खूप अपघात होतात संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सांगितले असता ते म्हणतात हे काम आमचे नाही ते काम त्यांचे आहे असे सांगून चाल ढकल चाललेले आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टर वर ताबडतोब कारवाई करावी असे कोठारी म्हणाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here