जामखेड महाविद्यालय जामखेडच्या प्रभारी प्राचार्य पदी डॉ. सुनील पुराणे यांची नियुक्ती
ग्रामीण विद्यार्थ्यांंसाठी ज्ञानगंगोत्री ठरलेल्या जामखेड महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी विद्यार्थीप्रिय प्राध्यापक डॉ. सुनिल जी. पुराणे यांची निवड झाली आहे.
महाविद्यालयातील प्राचार्य निवृत्त झाल्यानंतर संस्थेने ३४ वर्षे प्रदीर्घ अनुभव असणारे डॉ. पुराणे यांची निवड प्रभारी प्राचार्य पदी केली आहे.
डॉ. सुनील जी. पुराणे यांचा अध्यापन आणि प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव महाविद्यालयाला दिशा देणारा ठरणार आहे. होते डॉ. पुराणे हे १९९१ पासून जामखेड महाविद्यालयात गणित विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहे. त्यांनी पुणे विद्यापीठा मधून एम.एससी. तसेच २००८ मध्ये एम. फिल. प्राप्त केली आहे. पीएच.डी २०११ मध्ये मिळाली आहे.
महाविद्यालयामध्ये त्यांनी एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी, विद्यार्थी विकास अधिकारी, नॅक समन्वयक, पुणे विद्यापीठाच्या गणित बोर्डात अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून २०१८ ते २०२३ पर्यंत काम पाहिले आहे. नेहमीच विद्यार्थी आणि महाविद्यालयाच्या विकासामध्ये त्यांनी मोलाचे कार्य केलेले आहे. महाविद्यालयामध्ये अनेक वृक्षारोपन करून महाविद्यालयाचा परिसर हिरवागार निसर्गरम्य केला आहे.
नुकतीच संस्थेने त्यांना प्रभारी प्राचार्य पदाचे जबाबदारी सोपविली आहे. ही जबाबदारी पार पाडताना त्यांनी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली नॅक मध्ये ए ग्रेड, तसेच महाविद्यालयात नवीन पदवीत्तर स्तरावरती विषय सुरू करणे, क्रीडांगण अत्याधुनिक करणे, ग्रंथालयाची भव्य इमारत उभारणी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची प्रभावी अंमलबजावणी, विद्यार्थी विकासासाठी प्रयत्नशील असतील.
तसेच जामखेड पंचक्रोशीतील विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर न जाता आपल्याच महाविद्यालयामध्ये कसे येतील यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रयत्न करणार आहेत.
दि. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव बापू देशमुख, उपाध्यक्ष अरुणशेठ चिंतामणी, मा. सचिव शशिकांतजी देशमुख, मा. खजिनदार राजेशजी मोरे व सर्व सदस्य यांनी जो त्यांच्यावरती टाकलेला विश्वास महाविद्यालयाच्या विकासासाठी सार्थ ठरवण्याची ग्वाही त्यांनी बोलताना दिली.
डॉ. पुराणे यांच्या निवडीबद्दल सर्व सहकारी प्राध्यापक, कर्मचारी, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थीहीत सर्वोपरी मानणारे प्राचार्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्येही आनंद व्यक्त होत आहे.