मे महिन्यातच रामेश्वरचा धबधबा वाहू लागला… पर्यटकांचा ओढा सुरू
जामखेड पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटोदा तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे सौताडा येथील श्री क्षेत्र रामेश्वर या ठिकाणचा धबधबा यावर्षी मे महिन्यातच पंधरा दिवसाच्या पावसामुळे तसेच दि.२८ मे रोजी पडलेल्या पावसामुळे वाहू लागला असून यामुळे याकडे पर्यटकांचा ओढा सुरू झाला असे चित्र दिसते.
याबाबत अधिक माहिती अशी की पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील श्री क्षेत्र रामेश्वर या ठिकाणी श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते मात्र यावर्षी मे महिन्यातच पावसाचा जोर सुरू असल्याने दि.२८ मे रोजी झालेल्या पावसाने श्री क्षेत्र रामेश्वर येथील धबधबा वाहू लागला असून हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मे महिन्यातच गर्दी चालू केली असून या ठिकाणी असणारा निसर्गरम्य ठिकाण पर्यटकांनी सध्या गजबजू लागले आहे.
येणाऱ्या पर्यटकांनी स्वतःची काळजी घ्यावी व या ठिकाणी स्वच्छता बाळगावी त्याचप्रमाणे सध्या पाऊस चालू असल्यामुळे पर्यटकांनी स्वतःची व लहान मुलांची काळजी घेणे काळाची गरज असल्याचे पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किरण शिंदे पाटील यांनी म्हटले आहे.
जामखेड पासून जवळ व पाटोदा तालुक्यातील हे ठिकाण अत्यंत प्रसिद्ध आणि निसर्गरम्य आहे. सौताडा येथील रामेश्वर धबधबा, येथील लाभलेलं अप्रतिम निसर्गसौंदर्य . हजारो फूट उंचीवरून धीरगंभीर आवाज करीत खोल दरीत धो धो कोसळणारा धबधबा हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे, परतीच्या दमदार पावसामुळे हा धबधबा पुन्हा सुरू झाला आणि पर्यटकांना आकर्षित करु लागला आहे.
मराठवाड्याचे मिनी महाबळेश्वर म्हणून परिचित असलेला पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील प्रसिद्ध रामेश्वर धबधबा हा श्रावण महिन्यात धार पडत असते पण या वर्षी मे महिन्यातच धार सुरू झाली आहे. सध्या धो धो वाहात आहे. यामुळे येथील अप्रतिम निसर्गसौंदर्य पर्यटकांना भुरळ घालीत असुन हे सौंदर्य ‘ याची देही याची डोळा ‘ पाहण्यासाठी पर्यटकांना खुणावणारा धबधबा यथे पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे.
विंचरणा या नदीच्या उगमापासून राज्यात प्रसिद्ध धबधबा असलेल्या सौताडा येथील रामेश्वर पर्यंतच्या 20 किलोमीटरच्या अंतरात या नदीवर सौताडा येथील रामेश्वर साठवण तलाव, भुरेवाडी, लांबरवाडी, मुगगाव अशी तलावांची मालिका आहे.उगमस्थानापासून सौताडा पर्यंत वरचे चार तलाव भरल्याशिवाय सौताडा येथील रामेश्वर साठवण तलाव भरत नाही आणि हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याशियाय येथील प्रसिद्ध धबधबा सुरू होत नाही. या वर्षी मे महिन्यातच सुरू झाला आहे.