कर्जत- जामखेड राष्ट्रीय महामार्गावर गॅस सिलेंडरची गाडी पलटी
कर्जत जामखेड महामार्गावरील पाटोदा गरडाचे परिसरात गुरुवारी (दि. २९ मे) रात्री २ वाजण्याच्या सुमारास गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक पलटी झाल्याची घटना घडली सुदैवाने कोणतीही जीवीत हाणी झाली नाही. अनर्थ टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
चाकण पुणे येथून गॅस सिलेंडर भरून लोहा नांदेडयेथे ट्रक चाललेला होता. जामखेड पासून जवळच पाटोदा गरड येथे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रोडच्या खोल खड्यात पलटी झाली. यामुळे सिंलेडर अस्ताव्यस्त पडलेले होते.
ट्रक पलटी झाल्याची माहिती मिळताच गावातील सामाजिक कार्यकर्ते गफ्फार पठाण यांनी घटनास्थळी धाव घेत ताबडतोब जामखेड पोलीसांना फोन केला. ताबडतोब पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यामुळे टाक्या चोरांचा प्लॅन फेल गेला. सदर ट्रकमध्ये घरगुती वापरासाठीचे ५०० पेक्षा अधिक गॅस सिलेंडर होते. ट्रक पलटी झाल्यानंतर सिलेंडर फुटण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र सुदैवाने कोणताही स्फोट झाला नाही. पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेने आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व सिलेंडर सुरक्षितपणे दुसऱ्या ट्रकमध्ये हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेबाबत माहिती देताना पाटोदा गरडाचे येथील माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते गफ्फारभाई पठाण यांनी सांगितले की, “सदर घटना मध्यरात्री घडली असून सुदैवाने कोणतीही हानी न होता मोठा धोका टळला.”
या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. चालकाने नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली आहे. जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.