Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या प्रशिक्षणाचा लाभ स्वसंरक्षणासाठी व समाज हितासाठी करावा – संजय काशिद शंभुसूर्य...

प्रशिक्षणाचा लाभ स्वसंरक्षणासाठी व समाज हितासाठी करावा – संजय काशिद शंभुसूर्य मर्दानी खेळ, योग व मल्लखांब प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जामखेडमध्ये भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबीरास प्रारंभ

0
520

जामखेड न्युज—–

प्रशिक्षणाचा लाभ स्वसंरक्षणासाठी व समाज हितासाठी करावा – संजय काशिद

शंभुसूर्य मर्दानी खेळ, योग व मल्लखांब प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जामखेडमध्ये भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबीरास प्रारंभ

विद्यार्थ्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाचा लाभ स्वसंरक्षणासाठी व समाज हितासाठी करावा. या कलेचा सराव आवश्यक आहे, कोणत्याही क्षेत्रात नैपुण्य मिळवण्याची संधी विद्यार्थ्यांनी दवडू नये. विद्यार्थ्यांनी चांगले नागरीक होण्याचे ज्ञान अशा कलेतून घ्यावे असे भाजपा शहरप्रमुख संजय काशिद यांनी सांगितले.

जामखेडमध्ये शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात मुला-मुलींना लाठी-काठी, दांडपट्टा यांसारख्या मर्दानी खेळांचे प्रशिक्षण दिले जात आहे. मुलांच्या व मुलीच्या स्वसंरक्षणासाठी शिवकालीन युद्ध कलेच्या मर्दानी खेळांचे प्रशिक्षणात लाठी काठी प्रशिक्षण, दांडपट्टा प्रशिक्षण, ढाल तलवार तसेच मुलींसाठी प्राथमिक संरक्षण कौशल्य, भालाफेक या शस्त्र व शास्त्रविद्या यांचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले. यात शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले आहेत.


सध्याच्या काळात आधुनिक शस्त्रांचा वापर वाढला असला तरी जगभरात भारतीय प्राचीन युद्ध कलेचं महत्त्व सर्वश्रुत आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी जोपासलेल्या शिवकालीन कला आणि शस्त्रविद्याला ऐतिहासिक महत्त्व आहे.

मात्र, आधुनिक काळात जगभरात नावाजलेली भारतीय प्राचीन युद्ध कला ही काळाच्या ओघात लोप पावत चालली आहे. भारताच्या या प्राचीन युद्ध कलेला जिवंत ठेवत तसेच स्व – संरक्षणासाठी तिचा वसा जपण्याचे काम शंभुसूर्य मर्दानी खेळ, योग व मल्लखांब प्रशिक्षण संस्था करत आहे असे मत बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र व गोवा संयोजक विवेकजी कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

यावेळी बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र व गोवा संयोजक विवेकजी कुलकर्णी, उद्योजक संतोषशेठ फिरोदिया, भाजपा शहर मंडळ अध्यक्ष संजय (काका) काशिद, अँड. प्रसादजी गोले, वि.ही.प. जामखेड प्रखंडमंत्री दिगंबर राळेभात, धनराजजी पवार, भाजपा युवा नेते हृषिकेश मोरे,साहिलशेठ भंडारी, अँड अमोल जगताप, बोराटे सर,कपिल राऊत सर आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!