Friday, February 13, 2026
Home शैक्षणिक बातम्या स्व. देवराव दिगांबर वराट फार्मसीची साकत येथे परीक्षा सुरळित सुरू परीक्षार्थींचे...

स्व. देवराव दिगांबर वराट फार्मसीची साकत येथे परीक्षा सुरळित सुरू परीक्षार्थींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

0
407

जामखेड न्युज—–

स्व. देवराव दिगांबर वराट फार्मसीची साकत येथे परीक्षा सुरळित सुरू

परीक्षार्थींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

स्व. देवराव दिगांबर वराट फार्मसी साकत येथे डि फार्मसी प्रथम वर्ष व डि फार्मसी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थांची परीक्षा दि. 7 मे पासून सुरळीत सुरू झाली आहे. परीक्षार्थींचे संस्थेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

स्व. देवराव दिगांबर वराट फार्मसी साकत येथे मे 2025 पासून परीक्षेकरिता महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई ने नवीन परीक्षा केंद्र मंजूर केले.

यामुळे फार्मसीच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

स्व. देवराव दिगांबर वराट फार्मसी संस्थेचे अध्यक्ष प्रा अरूण वराट व सचिव तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन परीक्षा केंद्रावर स्वागत केले.

यावेळी फार्मसी काॅलेजचे प्राचार्य डॉ. गोरक्ष बारगजे, परीक्षा नियंत्रक प्रा. वंदना कोल्हे
प्रा. डिसले, प्रा. बडे मॅडम, प्रा. वैष्णवी मुरूमकर, प्रा. सय्यद मॅडम, संस्थेचे कार्यालयीन अधिक्षक कृष्णा पुलवळे, सतिष ओटे, अशोक नेमाने, उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!