युवकांनी उद्योग क्षेत्रात येऊन स्वावलंबी बनावे – अनिलजी वराट
शिस्तबद्ध हगामा म्हणून साकत च्या हगाम्याची नोंद
श्री साकेश्वर महाराज जागृत देवस्थान म्हणून परिसरात प्रसिद्ध आहे. देवाचा कृपाशीर्वाद सर्वांवर आहे. गावाच्या विकासासाठी मी सदैव तयार आहे. परिसरातील तरूणांनी एकत्र येऊन उद्योग क्षेत्राकडे वळावे व स्वावलंबी बनावे. एकमेकांना सहकार्य करावे असे मत धारा गृप आँफ कंपनी इंदोर चे चेअरमन अनिलजी वराट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जामखेड तालुक्यातील साकत येथे श्री साकेश्वर महाराज यात्रेनिमित्त सोमवारी सकाळी कावड मिरवणूक तसेच धारा गृप आँफ कंपनी इंदोर यांनी सात पवित्र नद्यांचे पाणी आणून भव्य दिव्य मिरवणूक काढत देवाचा जलाभिषेक करून यात्रेला उत्साहात सुरूवात झाली होती.
गुलालाची उधळण तसेच लेझीम व वाद्यवृंदाच्या निनादात सकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. देवाचा जलाभिषेक झाला सायंकाळी पाच वाजता शेरणी वाटप व रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत तसेच रात्री बारा वाजता देवाची पालखी छबिना निघते सर्व भाविक भक्त भक्ती भावाने दर्शन घेतात.मंगळवारी भव्य दिव्य कुस्त्यांचा थरार पाहवयास मिळाला.
कुस्त्यांच्या हगाम्याचे खास आकर्षण म्हणजे पै. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख, पै. देवा थापा, वंदना ठाकूर इंदोर विश्व बाँडी बिल्डिंग विजेता व नित्या सिंग मॅरेथॉन विजेती उपस्थित होते. यावेळी धारा गृप आँफ कंपनी इंदोर चे चेअरमन अनिलजी वराट पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी गावकऱ्यांना यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मी कोणत्याही पक्षासाठी राजकारण करत नाही. मला माणसे जोडायचे आहेत. व त्यांना स्वावलंबी बनवायचे आहे. जामखेड परिसरात नव नवीन प्रोजेक्ट टाकण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच सिकंदर शेख या पहिलवानाचा खेळ मला आवडतो. तो प्रमाणिक व इमानदार आहे.
यावेळी बोलताना महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख म्हणाले की, अनिलजी वराट यांचे गावासाठी खूप मोठे योगदान आहे. गावकऱ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने गावाचा विकास साधून घ्यावा. यात्रेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. अनिलजी वराट यांची गावच्या विकासासाठी तळमळ पाहून त्यांचा खूप अभिमान वाटतो.
यावेळी बोलताना अभिजित वराट म्हणाले की, मी वडिलांचे सामाजिक काम पुढे सुरूच ठेवणार आहे. व वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार आहे. यात्रेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना ठाकूर इंदोर विश्व बाँडी बिल्डिंग विजेत्या म्हणाल्या की, जिद्द चिकाटी व मेहनतीबरोबरच आपल्या पाठिशी एक अदृश्य शक्ती असते. मुलांबरोबर मुलींनी खेळाकडे वळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी विष्णू वराट डायरेक्टर न्यू डेली ज्युनियर काॅलेज इंदोर, डायरेक्टर विराट डिजिटल इंडिया प्रा. लि. यांनी दहा दिवस गावामध्ये थांबून संपूर्ण हगाम्याचे खास असे नियोजन केले. यामुळे तालुक्यात सर्वात शिस्तबद्ध हगामा म्हणून साकतची नोंद झाली आहे. यावेळी विश्वकर्मा गीतांजली वंदना ठाकूर यांच्या प्रशिक्षक, नित्या सिंग मॅरेथॉन सुवर्ण पदक विजेत्या रनर व कराटे गोल्ड मेडल विजेत्या उपस्थित होत्या.