मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दशरथ कोपनर यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल जामखेड तालुका लोकमान्य वाचनालयाच्या वतीने सत्कार

0
183

जामखेड न्युज——

मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दशरथ कोपनर यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल जामखेड तालुका लोकमान्य वाचनालयाच्या वतीने सत्कार

जामखेड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष
दशरथ कोपनर यांना जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त झाला या निमित्ताने लोकमान्य तालुका वाचनालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख, माजी प्राचार्य अनंता खेत्रे, माजी प्राचार्य श्रीकांत होशिंग, राजेंद्र देशपांडे उपस्थित होते.

जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील
आणखिरीदेवी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य दशरथ कोपनर यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार देण्यात आला आहे. याबद्दल त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दशरथ कोपनर यांनी 1997 मध्ये चन्नापा माध्यमिक विद्यालय पिंपळगाव उंडा येथे मुख्याध्यापक म्हणून सेवा केली आता ते आणखिरीदेवी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय फक्राबाद येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.

आपल्या मुख्याध्यापक व प्राचार्य पदाच्या काळात शालेय शिस्त, वृक्षारोपण, तसेच अनेक खेळाडू घडविण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. याच कामाची दखल घेत जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देण्यात आला आहे.

आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल शारदा शिक्षण प्रसारक मंडळ संगमनेर संस्थेचे संस्थापक सचिव आर. जी. गाडेकर, अध्यक्ष सुलोचना गाडेकर, चेअरमन प्रविण गाडेकर, स्थानिक स्कुल कमिटी अध्यक्ष व सरपंच विश्वनाथ राऊत, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, विस्तार अधिकारी खताळ, माजी प्राचार्य अनंता खेत्रे, माजी प्राचार्य श्रीकांत होशिंग, प्राचार्य बी. ए. पारखे, प्रा. रमेश अडसूळ, प्रा. आप्पा शिरसाठ, दत्ता काळे, शंकर खताळ, रमेश चौधरी, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष पी. टी गायकवाड, भरत लहाने, अनिल देडे, भाऊसाहेब इथापे, संघटनेचे नेते एकनाथ चव्हाण, मुकुंद सातपुते, तसेच लिपिक संघटनेचे आदरणीय ईश्वर कोळी, विजय गव्हाणे, विजय हराळे, धनवडे भाऊसाहेब तसेच आणखिरीदेवी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here