सावरगाव येथे शेतात करंट बसून शेतकऱ्याचा मृत्यू, परिसरात शोककळा
जामखेड तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी शहाजी भानुदास ढवळे वय 60 वर्षे यांना शेतात विजेचा करंट बसून जागीच मृत्यू झाला. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
शहाजी ढवळे हे सकाळी स्वतः च्या शेतात गेले असताना शेतात करंट बसून जागीच मृत्यू झाला रानडुक्करांच्या उपद्रवामुळे शेताच्या बांधावर विजेच्या तारेचे कुंपन चालतात यात विजेचा प्रवाह सोडला जातो सकाळी काढण्यात येतो ढवळे यांनी सायंकाळी रानडुक्करे शेतात येऊ नयेत म्हणून करंट लावलेला होता. सकाळी काढण्यासाठी गेले असता त्यांना करंट बसून जागीच मृत्यू झाला.
शहाजी ढवळे हे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून दुध धंदा करत होते. जामखेड शहरात दररोज सकाळी दुध घरोघरी घालत होते. जवळपास वीस पंचवीस गाई म्हशीची जोपासना करत होते त्यामुळे दुधही भरपूर होते एक हक्काचा आणि खात्रीशीर दुध मिळणार अशी ढवळे यांनी ओळख निर्माण केली होती.
ढवळे यांचा शेतात सकाळी करंट बसून मृत्यू झाला ते घरी येईनात म्हणून घरचे पाहण्यासाठी गेले असता ते खाली पडलेले दिसले ताबडतोब जामखेड येथील दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले शवविच्छेदन करून सकाळी सावरगाव येथील वस्ती वर शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला.
ढवळे यांच्या मागे पत्नी एक मुलगी, दोन मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
चौकट सध्या परिसरात रानडुक्करांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव आहे. मोठ्या प्रमाणात ते पिकांचे नुकसान करतात. यामुळे शेतकरी विजेचा करंट लावतात पण यामुळे धोका निर्माण होतो. शासनाने रानडुक्करांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.