जामखेड न्युज——
छोट्याशा शैक्षणिक रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करणाऱ्या सनराईज शैक्षणिक संकुलचे अध्यक्ष डॉ. संजय भोरे यांचा कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार
डॉ. संजय भोरे यांनी तेवीस वर्षापूर्वी पाडळी येथे माध्यमिक विद्यालय सुरू केले आणि आज या रोपट्याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. यामुळे अनेकांचा संसार उभा राहिला आहे. अनेकांना नोकरी मिळाली डॉ. भोरे यांनी जिद्द, चिकाटी आणी आत्मविश्वासाने शाळेच्या मान्यतेपासून अनुदानापर्यतच्या प्रवासात अनेक अडचणीचा सामना करत न डगमगता प्रयत्न करत आज तालुक्यात शैक्षणिक संस्थेचा वटवृक्ष तयार केला आहे याबद्दल कृतज्ञता म्हणून डॉ भोरे यांचा संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
स्व: विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव च्या वतीने सनराईज् शैक्षणिक संकुला चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉ. संजयजी भोरे साहेब यांचा सत्कार करण्यात आला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विजयकुमार मनेरे, सुनील पठाडे, सुधाकर अब्दुले, हनुमान पाटील , रामभाऊ टिळेकर, आण्णा महारनवर यांनी डॉ संजय भोरे यांचा फेटा बांधून शाल, श्रीफळ देऊन व पेढे भरून सत्कार केला. तसेच संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या श्रीमती जोगदंड मॅडम यांचा सत्कार श्रीमती काळे मॅडम व श्रीमती साधना दंडवते मॅडम यानी शाल श्रीफळ गुलाब पुष्प व पेढे भरून आनंदात केला.
डॉ. संजय भोरे यांनी उभ्या केलेल्या शैक्षणिक संस्थेचा झाला वटवृक्ष
१)साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय पाडळी (जुन 2001)
२)स्व.एम.ई भोरे ज्युनिअर कॉलेज पाडळी (जुन 2009)
3) सनराईज् इंग्लिश स्कूल पाडळी (जुन 2015)
4) संभाजीराजे ज्यु. कॉलेज देवदैठण ( जुन 2019)
5) स्व: विठ्ठल भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव ( जुन 2023)
अशा वटवृक्षात रुपांतर केले व त्या वटवृक्षाला फळे लाभली या सर्व वटवृक्षाचे श्रेय डॉ. संजय भोरे यांना जाते असे त्यांनी प्रतिपादन केले.
स्व:विठ्ठल भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव चे सह-शिक्षिका साधना दंडवते मॅडम यांनी शाळेचा सर्व लेखाजोखा विद्यार्थ्यांच्या व स्टाफच्या पुढे मांडला शाळेची सुरुवात 2003 ला सुरू झाली त्याला कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता मिळाली व 2009 साली शासनाने कायम शब्द वगळला व शाळेचे 2012 साली शाळेचे मूल्यांकन झाले, त्या मध्ये अनुशेषाचे पालन केले नाही म्हणून शाळा अनुदानास अपात्र झाली, नियमानुसार अनुदानाचा मार्ग संपला त्यामुळे त्यांची विद्यार्थी संख्या हळूहळू कमी झाली व विद्यालय बंद पडण्याच्या मार्गावर आले. सन 2021 साली देव माणूस म्हणून डॉ.संजयजी भोरे साहेब यांचा संपर्क झाला व त्यांच्या पाडळी येथील माध्यमिक, ज्यु. कॉलेज व इंग्लिश स्कूल चा आलेख उंचावत होता माध्यमिक शाळेला 2009 मध्ये 100% अनुदान मिळाले व जुनिअर कॉलेज ला नोव्हेंबर 2020 पासून 20% अनुदान मिळाले आत्ता ते 60 % अनुदानात बसले आहे.
शिवशैल प्रतिष्ठान अहमदनगर या संस्थेने त्यांची स्व. विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय ही शाळा त्यांनी आताचे सनराईज मेडिकल ऍण्ड एज्युकेशन फौंडेशन जामखेड या संस्थेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय संस्था व शाळेतील कर्मचाऱ्यांनी घेतला.
त्याची पूर्ण प्रोसेस जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या दोन वर्षात ( कोविड चा काळ असल्यामुळे विलंब होत गेला )कुसडगाव ते मंत्रालय मुबंई हा बऱ्याच टप्याचा प्रवास पूर्ण करून 1 मार्च 2023 ला व या शाळे चा हस्तानंतरा चा शासन जि. आर.निघाला तदनंतर खऱ्या अर्थाने कुसडगाव ची शाळा सनराईज मेडिकल ऍण्ड एज्युकेशन या संस्थेस जोडली गेली.
मग तेथून पुढे शासकीय अनुदान मिळण्यासाठी चा प्रवास सुरु झाला शाळेचे मुल्यांकन त्रुटी प्रस्ताव शिक्षण विभाग स्वीकारत नव्हता तो स्वीकारण्यासाठी माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे साहेब यांचे सहकार्य मिळाले.संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे हे राम शिंदे साहेब यांना घेऊन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे कडे गेले त्यांनी खास बाब म्हणून 10 वर्षानंतर शाळेचा मूल्यांकन त्रुटी पूर्ततेचा प्रस्ताव स्वीकारण्याचे पत्र विभागाला शिक्षण काढले व नंतर परिपूर्ण प्रस्ताव डॉ. संजय भोरे यांनी 2023 मध्ये शिक्षण विभागाला तात्काळ सादर करून मूल्यांकनास पात्र झाला,तो शासन स्तरावर अनुदानासाठी अघोषित होता मग शासनाने 10ऑक्टोबर 2024 रोजी जि आर काढून 20 टक्के अनुदानस पात्र केला व शाळेला जीवनदान दिले व ते आज पूर्णपणे ती शाळा जिवंत झाली याचे सर्व श्रेय साहेबांना जाते असे त्यांनी सांगितले.
स्व. एम.ई भोरे ज्युनिअर कॉलेजचे प्रा.विनोद बहिर सर यांनी शाळेसाठी अनुदान मिळण्यासाठी जे प्रयत्न केले ते त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. संभाजीराजे ज्युनिअर कॉलेज देवदैठण चे प्राचार्य प्रा.दादासाहेब मोहिते सर यांनी असे प्रतिपादन केले की शाळा ही आपली कुटुंब आहे आणि आपण या कुटुंबाला आपल्या कुटुंबाप्रमाणे जपू वाढू असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास उपस्थित सनराईज मेडिकल & एज्युकेशन फौंडेशन चे संस्थेचे संचालक प्रा.तेजस भोरे काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगावचे मुख्याध्यापक विजय मनेरे, सुनील पठाडे, अब्दुले, काळे मॅडम, दंडवते मॅडम, हनुमंत पाटील, रामभाऊ टिळेकर ,अण्णा महारनवर उपस्थित होते
साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय व स्व. एम. ई.भोरे ज्यु कॉलेज पाडळी च्या प्राचार्या अस्मिता जोगदंड मॅडम, सुषमा भोरे मॅडम,चंद्रकांत सातपुते, महेश पाटील, दिनकर सरगर,हनुमंत वाघमारे, बुवासाहेब दहीकर, उपस्थित होते.
सनराईज् इंग्लिश स्कूलचे प्राचार्य श्री.अमर भैसडे, बिभीषण भोरे सुरज वाघमारे,जयश्री कदम मॅडम ,
हर्षा पवार मॅडम, सानिया सय्यद, वैष्णवी तनपुरे मॅडम , जयश्री साप्ते, दीपक दहीकर. संदीप लांडगे
स्व.एम.ई भोरे ज्युनिअर कॉलेज पाडळी चे प्राचार्या तथा संस्थेच्या सचिव अस्मिता जोगदंड, तेजस भोरे ,विनोद बहिर प्रा. प्रदीप भोंडवे ,स्वाती पवार मॅडम, दादासाहेब मोहिते, नारायण आयकर, छबिलाल गावित, सागर कदम, विवेक सातपुते, सुनील घाडगे उपस्थित होते