कुटे भाजपात गेल्याने कारवाई थंडावली – रमेश आजबे जामखेडमध्ये शनिवारी मोर्चा व रास्ता रोको

0
1289

मखेड न्युज——

कुटे भाजपात गेल्याने कारवाई थंडावली – रमेश आजबे

जामखेडमध्ये शनिवारी मोर्चा व रास्ता रोको

 

जामखेड तालुक्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेमध्ये ज्या ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत अशा सर्वांनी उठा, जागे व्हा, आपल्या स्वतःच्या हक्कांसाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. आयुष्य भराची गोळा केलेली पुंजी पतसंस्थेत ठेवली आणी अचाणक बंद पडली गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार या लोकांनी काय करावे याचा प्रश्न पडला पण याच प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी. जामखेड मध्ये 21/9/2024 वार शनिवार रोजी प्रचंड मोर्चा व रास्ता रोको आयोजित केला आहे तरी ठेवीदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी केले आहे.

ज्ञानराधा को – आँप क्रेडीट सोसायटीवर प्रशासनाने कारवाई करावी तसेच दोन महिने गुन्हा दाखल होऊनही अद्याप गुन्हा वर्ग झाला नाही तो वर्ग करावा व ठेवीदारांना न्याय द्यावा अन्यथा अन्यथा शनिवारी सर्व ठेवीदारांसह खर्डा चौक जामखेड येथे रास्ता रोको आंदोलन व मोर्चा काढण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी दिला आहे.

 

ज्ञानराधा को – आँप क्रेडीट सोसायटी जामखेड शाखेत जामखेड व परिसरातील ६५०० ठेवीदारांचे ९० कोटी रुपये रूपये ठेव आहेत. त्या लवकरात लवकर मिळाव्यात अशी मागणी ठेवीदारांच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. तसेच दोन महिन्यांपूर्वी ज्ञानराधा पतसंस्थेवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र अद्याप तो वर्ग करण्यात आला नाही. सुरेश कुटे त्याची पत्नी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला म्हणून कारवाई केली जात नाही का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणतात की, उपविभागीय पोलीस अधिकारी आजारी आहेत म्हणून गुन्हा वर्ग करण्यात आला नाही तरी ताबडतोब गुन्हा वर्ग करण्यात यावा ठेवीदारांना न्याय द्यावा अन्यथा शनिवारी मोर्चा व खर्डा चौक जामखेड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा पोलीस स्टेशनला ठेवीदारांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे.

 

सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, प्रमोद राऊत,
सुतार सर, डॉ.प्रदीप कात्रजकर, संतोष शिंदे,
शिवलिंग राऊत, कुसुम खाडे, अँड महारुद्र नागरगोजे, उदयकुमार दाहितोंडे, पिंन्टू राळेभात, आशा गायकवाड, उज्वला फडतरे, सिंधु शिंदे, मीनाक्षी खरात, विमल राऊत, दीपा दस्तुरे, वच्छला वाळुंजकर, मधुकर जरे यांच्या सह अनेकांच्या निवेदनावर सह्या आहेत.

 

काही दिवसांपूर्वी नाही जातीसाठी लढा मातीसाठी गरीबांच्या हक्कासाठी असे घोषवाक्य घेऊन हभप अँड. महारुद्र ना गरगोजे जामखेड तहसील कार्यालया समोर विविध मागण्यांसाठी तीन दिवस उपोषण केले होते. यानंतर ज्ञानराज पतसंस्थेवर गुन्हा दाखल करण्यात आला. तरीही तो वर्ग करण्यात आला नाही प्रशासनाने ताबडतोब पतसंस्थेवर प्रशासक नियुक्त करावा तसेच कुटे त्याच्या संपतीचा लिलाव करून ठेवीदारांचे पैसे परत करावेत अशी मागणी अँड. महारुद्र नागरगोजे यांनी केली तसेच शनिवारी मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे असेही सांगितले.

 

बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टे को-ऑप सोसायटीकडे कर्जत-जामखेड तालुक्यातील सुमारे साडेसहा हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या ९० कोटी रुपयांहून अधिक ठेवी आहेत. परंतु या संस्थेकडून या ठेवीदारांची फसवणूक झाली आहे. या संस्थेची चौकशी करुन कारवाई करावी आणि कर्जत- जामखेड मतदारसंघातील ठेवीदारांसह सर्वच ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत यासाठीही आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती त्यामुळे ठेवीदारांमध्ये न्याय मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली होती.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर मोलमजुरी करण्याची वेळ

मुलांमुलींच्या उच्च शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी विश्वासाने अनेकांनी सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा पतसंस्थेत आपल्या आयुष्याची पुंजी ठेवली, स्वतः च्या पोटाला चिमटा घेऊन, मोलमजुरी करून, सेवानिवृत्ती नंतर उर्वरित आयुष्य व्याजाच्या पैशावर गुजरान करावी म्हणून जामखेड परिसरातील ठेवीदारांनी ज्ञानराधा को – आँप क्रेडीट सोसायटी जामखेड शाखेत जामखेड व परिसरातील ६५०० ठेवीदारांचे ९० कोटी रुपये रूपये ठेव आहेत. त्या लवकरात लवकर मिळाव्यात अशी मागणी आहे.

चौकट –

ज्ञानराधा पतसंस्थेतील पैसे परत मिळत नाहीत या मानसिक धक्क्यातून अनेक ठेवीदारांनी मृत्यू ला कवटाळले आहे.

जामखेड तालुक्यातील ज्ञानराधा बँकेत कोणाची ठेवलेली रक्कम अडकलेले पेमेंट संदर्भात या नंबरशी संपर्क साधावा –
रमेश आजबे – 8055998055
प्रमोद राऊत – 7588077838
सुतार सर 8275601801
डॉ.प्रदीप कात्रजकर – 9423464966
संतोष शिंदे – 8698520777
शिवलिंग राऊत – 9226245868
कुसुम खाडे- 9421338942

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here