फक्राबाद येथील शेतकरी पुत्र गणेश पवार सेट परीक्षा उत्तीर्ण पुणे येथे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू

0
1209

जामखेड न्युज——

फक्राबाद येथील शेतकरी पुत्र गणेश पवार सेट परीक्षा उत्तीर्ण

पुणे येथे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू

 

जामखेड तालुक्यातील फक्राबाद चे सुपुत्र, शेतकरी पुत्र गणेश भीमराव पवार वयाच्या २३ व्या वर्षी सेंट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत तसेच रयत शिक्षण संस्थेच्या पुणे येथील शाखेत इंग्लिश शिक्षक म्हणून कामावर रूजू झाले आहेत याबद्दल त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

फक्राबाद गावाचे सुपुत्र भीमराव पवार (पाहुणे) यांचे चिरंजीव गणेश भिमराव पवार याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून इंग्रजी विषयात मास्टर ऑफ आर्ट (MA English ) शिक्षण पूर्ण केले.

त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा सेट (SET ) पहिल्याच प्रयत्नात पास केली. याबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय,औंध (पुणे ) या महाविद्यालयात इंग्रजी विभागात वयाच्या 23 व्या वर्षी सहाय्यक प्राध्यापक म्हणून निवड झाली असून 8 ऑगस्ट 2024 पासून कार्यरत आहे.

वयाच्या २३ व्या वर्षी, SET पास होऊन रयत शिक्षण संस्थेवर कामाला लागणे ही गावांसाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे.

 

त्यांच्या या निवडीबद्दल फक्राबाद ग्रामस्थ, मित्रमंडळी व नातेवाईक यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here