श्री साकेश्वर विद्यालयात मोदक स्पर्धा संपन्न

0
1579

जामखेड न्युज——

श्री साकेश्वर विद्यालयात मोदक स्पर्धा संपन्न

 

नारळाचे मोदक, पेढ्याचे, बिस्किटाचे, उकडीचे
पुरणाचे असे कितीतरी प्रकारचे मोदक गणेशोत्सवामध्ये गृहिणी तयार करतात आणि त्याचा नैवेद्य गणपत्ती बाप्पाला दाखवतात. बाप्पाही खूश आणि घरची मंडळीही खूश. असेच स्वादिष्ट मोदक तयार करून श्री साकेश्वर विद्यालयात स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात एकुण 45 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

 

यात पाचवी ते सातवी लहान गट तर आठवी ते दहावी मोठा गट होता.
आठवी ते दहावी च्या गटात
प्रथम क्रमांक – प्रणिती ईश्वर मुरूमकर – नववी
द्वितीय क्रमांक – प्रियंका भाऊसाहेब डोके – दहावी
तृतीय क्रमांक – ऋतुजा श्रीकांत वराट – दहावी
पाचवी ते सातवी गटात
प्रथम क्रमांक – संस्कृती केशव मोरे – पाचवी
द्वितीय क्रमांक – सिद्धी राम भापकर – सहावी
तृतीय क्रमांक – अदिती सदाशिव अडसुळ – सहावी
मोदक हा गणपती बाप्पाचा अतिशय आवडता प्रसाद. जसा तो गणपतीला आवडतो तसा त्याच्या भक्तांचाही अतिशय प्रिय असा हा प्रसाद आहे. ज्याच्या ज्याच्या घरी गणेशोत्सव, त्याच्याकडे मोदक हे होणारच. अतिशय स्वादिष्ट, खमंग असे हे मोदक प्रत्येक घरात तयार होतात.

 

याच खमंग, सुबक मोदकांची स्पर्धा श्री साकेश्वर विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. घराघरातील अशा सर्व सुगरणींनी तयार केलेल्या उत्कृष्ट मोदकांची ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 
श्री साकेश्वर विद्यालयातील एकुण 45 मुलांनी मोदक स्पर्धेत सहभाग घेतला यात लहान गटात 23 तर मोठ्या गटात 22 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
परिषक साकतच्या सरपंच मनिषा साहेबराव पाटील, धनश्री हनुमंत पाटील, छाया चंद्रकांत वराट,
सुलभा लवुळ यांनी परिक्षण केले व मोठ्या गटातून तीन क्रमांक तर लहान गटातून तीन क्रमांक काढण्यात आले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ता काळे सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here