जामखेड न्युज——
शिवपट्टण (खर्डा) येथे कत्तलीसाठी चाललेले 55 जनावरे पकडले, चार जणांविरोधात गुन्हा दाखल
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे कत्तलीसाठी चाललेले 55 जनावरांचा टेम्पो सकाळी 06.30 वाजण्याच्या सुमारास खर्डा ते भुम रोडवर शिवपट्टण किल्याजवळ पकडण्यात आला असून
आठ वासरे मृत होते 47 जनावरे जिवंत आढळून आले आहेत. एकुण किंमत 4 लाख 74 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत चार जणांविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
खर्डा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी सकाळी 06.30 वाजण्याच्या सुमारास खर्डा ते भुम रोडवर शिवपट्टण किल्या जवळ, खर्डा ता.जामखेड जि. अहमदनगर येथे
आयशर कंपनीचा टेम्पो क्र. MH-17-T-3500 यामध्ये खडकत ता.आष्टी जि.बीड येथून धाराशिव येथे वरील वर्णनाचे व किंमतीची जणावरे टेम्पोमध्ये बळजबरीने भरून कत्तली करीता घेऊन जाताना मिळून आले आहेत. तसेच त्यापैकी आठ लहान वसरे मयत मिळून आले आहेत.