जामखेड तालुक्यात ड्रोन’च्या घिरट्या! नागरिकांमध्ये घबराट, प्रशासन अनभिज्ञ

0
2466

जामखेड न्युज——

जामखेड तालुक्यात ड्रोन’च्या घिरट्या! नागरिकांमध्ये घबराट, प्रशासन अनभिज्ञ

जामखेड तालुक्यातील अनेक गावात आकाशात रात्रीच्या वेळी अंधारात ड्रोन घिरट्या घालत आहेत. त्यामुळे नागरिकांत घबराट पसरली आहे. तालुक्यातील साकत परिसरात दोन दिवसांपूर्वी कडभनवाडी, कोल्हेवाडी परिसरात रात्रीच्या वेळी
ड्रोन घिरट्या घालत होते. रात्री मुंजेवाडी, डोळेवाडी परिसरात ड्रोन घिरट्या घालत होते. रात्रीच्या वेळी पोलीसांची गाडीही त्या भागात गेली होती पण त्यावेळी ड्रोन आढळून आला नाही.

 

जामखेड तालुक्यातील अनेक गावात रात्रीच्या वेळी अंधारात ड्रोन घिरट्या घालत आहेत याबाबत तहसीलदार गणेश माळी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, प्रशासनाकडे अद्याप कसलीही माहिती नाही असे सांगितले.

 

याबाबत पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्याशी
संपर्क साधला असता ते म्हणाले की, जामखेड तालुक्यातील काही गावातून सुरत चेन्नई महामार्ग जात आहे आम्ही महामार्ग अधिकारी यांना विचारले पण त्यांनी सांगितले की, आमचे ड्रोन नाहीत. रात्री आम्हाला मुंजेवाडी, डोळेवाडी ग्रामस्थांचा फोन आल्या नंतर आम्ही पोलीसांची गाडी पाठवली होती पण पोलीसांना ड्रोन आढळून आले नाहीत. ड्रोन का फिरतात याचा पोलिस शोध घेत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे.
आतापर्यंत पाथर्डी, शेवगाव या तालुक्यातील गावांमध्ये रात्रीच्या वेळी नागरी वस्त्यांवर ड्रोन घिरट्या घालत असल्याच्या घटना घडल्या आहेत. आता हे लोण जामखेड तालुक्यातही पसरले आहे.
दोन दिवसांपूर्वी कडभनवाडी, कोल्हेवाडी परिसरात रात्रीच्या वेळी ड्रोन घिरट्या घालत होते. रात्री मुंजेवाडी, डोळेवाडी परिसरात ड्रोन घिरट्या घालत होते.

 

अचानकपणे अंधारात नागरी वस्त्यांवर ड्रोन घिरट्या घालताना नागरिकांच्या निदर्शनास आले. सुमारे दोन ते तीन तासांपर्यंत ड्रोन घिरट्या घालत होते. सुरुवातीला नागरिकांनी ड्रोनकडे दुर्लक्ष केले.परंतु नंतर ड्रोन फिरत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. अनेक लोकांच्या मते रात्रीच्या वेळी ड्रोन च्या साहाय्याने काही घरांची रेकी केली जाते व नंतर घरफोडी होते अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

जामखेड तालुक्यातील अनेक गावात मागील आठ
दिवसापासून ड्रोन दिसू लागले आहेत. यामुळे या भागातील नागरिकांना जागरण करावे लागत आहे. ड्रोनच्या माध्यमातून चोरीसाठी टेहाळणी केली जाते की काय? का कोणते सर्वेक्षण सुरू आहे, सर्वेक्षण सुरू असेल तर प्रशासनाला याची माहिती का नाही, ते रात्रीच का येतात, नागरिक दिसल्यावर अचानक लाईट बंद करून गायब का होत आहेत,असे अनेक प्रश्न नागरिकांना पडत असल्यामुळे सर्व नागरिक रात्रीचे घराच्या बाहेर जागे राहत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here