आज ४५२ रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या ७५८ बाधितांची रुग्ण संख्येत भर – रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७१ टक्के शेजारचे आष्टी – पाटोदा तालुक्यात कडक निर्बंध, जामखेड करांनी काळजी गरज

0
211
जामखेड न्युज – – – 
जिल्ह्यात आज ४५२ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७९ हजार ३०४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७५८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ४४९ इतकी झाली आहे. जामखेड शेजारच्या आष्टी व पाटोदा या तालुक्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत जामखेड करांनी काळजी घेण्याची गरज आहे. नगर जिल्ह्य़ातील कोरोना संख्या वाढत चालली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३३८ आणि अँटीजेन चाचणीत ४०२ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०१, जामखेड ०३, नगर ग्रा. ०२, पारनेर ०१, पाथर्डी ०७ आणि श्रीगोंदा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३८, अकोले १४, जामखेड ०४, कर्जत २३, कोपरगाव १३, नगर ग्रा.१५, नेवासा १३, पारनेर १७, पाथर्डी ०६, राहता ११,  राहुरी ०८, संगमनेर ९७, शेवगाव ३१, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर २६ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ४०२ जण बाधित आढळुन आले. मनपा ०७, अकोले ३२, जामखेड १८, कर्जत ५४, कोपरगाव २२, नगर ग्रा. ०८, नेवासा ३०, पारनेर ६०, पाथर्डी ७३, राहता १४, राहुरी १०, संगमनेर २२, शेवगाव २३, श्रीगोंदा २०, श्रीरामपूर ०८ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १४, अकोले २२, जामखेड २९, कर्जत ४३, कोपरगाव १२, नगर ग्रा. २४, नेवासा ४८, पारनेर ७१, पाथर्डी ३६, राहता १६, राहुरी १६, संगमनेर ४७,  शेवगाव २४, श्रीगोंदा ३५, श्रीरामपूर ११, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या:२,७९,३०४*
*उपचार सुरू असलेले रूग्ण:३४४९*
*पोर्टलवरील मृत्यू नोंद:६०४०*
*एकूण रूग्ण संख्या:२,८८,७९३*
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*
*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*
*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here