सराईत दोन चोरट्यांकडून जामखेड पोलीसांनी 36 मोटार सायकल केल्या हस्तगत परिसरात एकच खळबळ

0
2935

जामखेड न्युज ——–

सराईत दोन चोरट्यांकडून जामखेड पोलीसांनी 36 मोटार सायकल केल्या हस्तगत

परिसरात एकच खळबळ

 

फायनान्स कंपनीत काम करत असल्याचे सांगून
आमच्या कडील मोटारसायकली कंपनीने ओढून आणलेल्या आहेत त्या तुम्हाला स्वस्त किंमतीत देतोत असे सांगून नातेवाईक व ओळखीच्या लोकांना विविध कंपनीच्या मोटारसायकली विकल्या होत्या याच अनुषंगाने जामखेड पोलीसांनी चोरीस गेलेल्या दहा लाख पस्तीस हजार रुपये किंमतीच्या 36 मोटारसायकली दोन सराईत चोरट्यांकडून हस्तगत केल्या आहेत.

36 मोटारसायकल चोर वैभव बाबासाहेब खेडकर वय 35 व सुधीर शहाजी सुरवसे वय 32 या दोघांना जामखेड पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत नुकतेच कर्जत जामखेड चे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे व जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी पत्रकारांना माहिती दिली.

यावेळी बोलताना वाखारे सांगितले की, दि. 16 आँगस्ट रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस काँन्टेबल कुलदीप घोळवे, पो. काँ. भगीरथ देशमाने हे बस स्थानक परिसरात पेट्रोलिंग करत असताना आरोपी वैभव बाबासाहेब खेडकर रा. माहिजळगाव, ता. कर्जत. जि. अहमदनगर हा संशयतरित्या बिगर नंबर प्लेट मोटारसायकलवर फिरत होता. यावेळी त्याच्या कडे मोटारसायकल कागदपत्रांची चौकशी केली असता समाधान कारक उत्तर देता आले नाही. यावेळी पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन जामखेड पोलीस स्टेशनला आणले व मोटारसायकल बाबत चौकशी केली असता त्याने सांगितले की मी व माझा मित्र सुजित शहाजी सुरवसे सदर मोटारसायकल चोरीत सहभागी असल्याचे सांगितले.

आरोपी वैभव खेडकर यांच्या कडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की, आम्ही काहीही कामधंदा करत नाहीत. दारू व चैन करण्यासाठी पैशाची गरज भागविण्यासाठी आम्ही जामखेड, श्रीगोंदा कर्जत, संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, धाराशिव, लातूर, बीड या जिल्ह्यातून गर्दीच्या ठिकाणाहून मोटारसायकली चोरी केल्याचे सांगितले.

चोरलेल्या मोटारसायकली आमच्या नातेवाईक व ओळखीच्या लोकांना सदर फायनान्स कंपनीचे नाव सांगून कंपनी कडून ओढून आणलेल्या आहेत असे खोटे सांगून या मोटारसायकली परिसरात विकल्या आहेत.

दोन्ही आरोपींकडून जामखेड पोलीसांनी दहा लाख पस्तीस हजार रुपये किंमतीच्या 36 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. याबाबत पोलिसांकडून सापडलेल्या मोटारसायकल मालकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. यामुध्ये 36 मोटारसायकल पैकी हरवलेल्या 16 मोटारसायकल बाबत विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडे आणखी चौकशी सुरू आहे.

याबाबत जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी असे आवाहन केले आहे की, ज्यांची मोटारसायकल चोरीस गेलेली आहे त्यांनी जामखेड पोलीस स्टेशनला संपर्क करावा.

सदरची कारवाई ही राकेश ओला पोलीस अधिक्षक अहमदनगर, प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक अहमदनगर, विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश पाटील, सपोनि वर्षा जाधव, जामखेड शहर बीटाचे अंमलदार पोहेकॉ/प्रविण इंगळे, पोना.संतोष कोपनर, पोना.जितेंद्र सरोदे, पोकॉ.प्रकाश मांडगे, पोकॉ.कुलदिप घोळवे, पोकॉ.देविदास पळसे, पोकॉ.ज्ञानेश्वर बेल्हेकर, पोकॉ.भगिरथ देशमाने, पोकॉ.जिब्राईल शेख व सायबर सेलचे पोकॉ.नितीन शिंदे व पोकॉ.राहुल गुंडु यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here