जामखेड न्युज——
गोकुळ गायकवाड यांच्या ताटातूट कथासंग्रहास राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर, आतापर्यंत एकूण अकरा राज्यस्तरीय पुरस्कार
जामखेड येथील आदर्श शिक्षक व साहित्यिक
गोकुळ गायकवाड यांच्या ताटातूट या ह्रदयस्पर्शी कथासंग्रहाला राज्यस्तरीय स्व राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार २०२४ जाहीर करण्यात आला आहे. यामुळे त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुरस्कार वितरण सोहळा लवकरच घेण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष डॉ संदीप डाकवे यांनी कळविले आहे.
जामखेड येथील बौध्दाचार्य, आदर्श शिक्षक, नवोदित साहित्यिक गोकुळ गायकवाड यांची साहित्य क्षेत्रातील वाटचाल अतिशय दमदार सुरू आहे. धम्मपदा बोलती दोहे आणि गाथा ‘ या वैचारिक ग्रंथास एकूण सहा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. तर ‘ माझा गाव माझी माणसं या चरित्र ग्रंथासही आता पर्यंत चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांना साहित्यक्षेत्रातील एकूण आकरा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार मिळाले आहेत.
वेदना हा कविता संग्रह लवकरच प्रकाशित करण्यात येत आहे…. गायकवाड यांची स्वतंत्र लेखनशैली अनेकांच्या पसंतीला उतरली आहे. नामवंत साहित्यिकांनी त्यांच्या लेखनाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांचे धम्मकार्यही खूप प्रेरणादायी आहे. गाव तेथे बुद्ध विहार ही चळवळ त्यांनी यशस्वीपणे राबविली आहे. धम्मगिरी बुद्ध विहार गिरलगाव ता भूम जि धाराशिव येथे गरजूंचे विवाह विधी मोफत करून देत आहेत. त्यांचे हस्ते हजाराच्या वर विवाह विधी लावले आहेत. ते निसर्ग प्रेमीही आहेत प्रत्येक वर्षी पावसाळ्यात पिंपळ वृक्षांचे कुंडीत रोप लावून एक वर्षा नंतर योग्य ठिकाणी लागवड करतात.
त्यांनी अनेक वड आणि पिंपळ वृक्षांचे रोपण आणि संवर्धन केले आहे. ते जिल्हा परिषद आदर्श शिक्षक सन्मानित आहेत ते सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असल्यामुळे सर्व परिचित आहेत. जामखेड तालुका मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष अ.य पवार, कार्याध्यक्ष मा.मधुकर आबा राळेभात डॉ जतीनबोस काजळे , डॉ सचिन काकडे, विनायक राऊत, प्रा. सरसमकर, कुंडल राळेभात यांनी जेष्ठ कवी रंगनाथ राळेभात यांनी अभिनंदन केले.