Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या धाकटी पंढरी धनेगाव अनेक मुलभूत सुविधांपासून वंचित, वारकऱ्यांचे रस्त्यासाठी खेड्यात भजन

धाकटी पंढरी धनेगाव अनेक मुलभूत सुविधांपासून वंचित, वारकऱ्यांचे रस्त्यासाठी खेड्यात भजन

0
438

जामखेड न्युज——

धाकटी पंढरी धनेगाव अनेक मुलभूत सुविधांपासून वंचित,
वारकऱ्यांचे रस्त्यासाठी खेड्यात भजन

 

जामखेड तालुक्यातील धनेगाव येथे ग्रामस्थांनी धनेगाव सोनेगाव या मुख्य रस्त्या वरील खड्ड्यात खड्ड्याची पूजा करून खड्ड्यात बसून ह भ प पद्माकर काळे , ह भ प बबन भोसले व विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट धनेगावचे अध्यक्ष तथा माजी सरपंच भरत बप्पा काळे यांनी भजन करत खराब रस्त्याच्या निषेध नोंदवला. दोन लोकप्रतिनिधी असतानाही रस्ता नाही.


बुधवार रोजी आषाढी एकादशी निमित्त धाकटे पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनेगाव येथील मंदिराचे दर्शन घेण्यासाठी मराठवाड्याचे प्रवेशद्वार व अहमदनगर जिल्ह्याचे शेवटचे टोक व तीन जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या प्रति पंढरपूर म्हणून धाकटी पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनेगाव येथे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. परंतु धनेगाव येथे येण्यासाठी सोनेगाव येथून तीन किलोमीटर पायी चालत गाड्या रस्त्याच्या कडेला लावून काही भाविकांना यावे लागले तर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मोठे मोठे खड्डे चिखल व अरुंद रस्त्यामुळे भाविकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.


त्यामुळे या धाकटे पंढरीत पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातून येणाऱ्या भाविकांनी जामखेड तालुक्याला दोन लोकप्रतिनिधी असताना सुद्धा धनेगाव नगरीस विकासापासून वंचित राहावे लागत असल्याची खंत भक्त मंडळी व्यक्त करताना दिसून आले. वारकऱ्यांना चिखल तुडवत लांबच्या लांब रांगा लावून मूलभूत सुविधांपासून दुर्लक्षित असणाऱ्या धनेगाव मध्ये जावे लागले. त्यातच ठेकेदार प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यानेच एकादशीच्या दिवशीच एका बाजूने रस्ता खोदून ठेवल्यामुळे अनेक भक्त या खड्ड्यात पडले तर काहींच्या गाड्या साईड पट्ट्या खोदलेल्या खड्ड्यामध्ये गेल्याने अनेक समस्यांना भाविकांना सामोरे जावे लागले.

धनेगाव येथे दळणवळणाचा मोठा प्रश्न ग्रामस्थांपुढे आहे .त्यातच एसटी बस सतत बंद, शाळकरी मुलांना बाहेर गावाला शिक्षणासाठी जाताना अडचणीचा सामना करावा लागतो, आजारी पेशंट ,गरोदर महिला, वृद्ध रुग्ण ,शेतीमाल दूध व्यवसायिक आधी दळणवळणाचे गैरसोय होत असल्याने समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यातच भारत संचार निगमचे मोबाईल सेवा सतत बंद राहिल्यामुळे लोकांचा संपर्क तुटतो त्यातच अभ्यासक्रम करणारे विद्यार्थ्यांनाही मोबाईल च्या इंटरनेट बंदचा त्रास सहन करा लागतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर पाऊस पडल्यानंतर चिखलाचे साम्राज्य पसरल्यामुळे मुलांना मैदानी खेळ खेळणे ही जिकरीचे झाले आहे. गावातीलच राहणाऱ्या आदिवासी पारधी समाजाला पाणी पिण्यासाठी एक किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे अशा विविध स्थानिक प्रश्नांसह ग्रामस्थांसह विठ्ठल मंदिरात दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना वाहने असून सुद्धा लांब वर पायी चिकल तुडत यावे लागले.

एकेरी व रस्ता असल्यामुळे वाहनधारकांची मोठी कसरत करावी लागत होते. त्यातच सोनेगाव च्या पुढे धनेगाव पर्यंत साईड पट्टे खोदल्यामुळे सोनेगाव परिसरात वाहने उभी करत भाविकांना प्रति पंढरपूर धनेगाव पर्यंत लहान मुलं , वृद्ध वयस्कर व्यक्तीं, महिलांना चिखल तुडवत दर्शन घेण्यासाठी जाण्याची वेळ या प्रशासन व ठेकेदाराच्या दुर्लक्ष झाल्याने भाविकांनी संताप व्यक्त केला.

यावेळी धनेगाव ग्रामस्थांनी माजी सरपंच तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भरत बप्पा काळे यांच्यासह ह भ प पद्माकर काळे, ह भ प बबन भोसले, दत्तात्रय काळे, बाळासाहेब काळे, संतोष काळे ,मनोज काळे, रघुनाथ सुरवसे, वैभव बाळासाहेब काळे, गणेश काळे, महेंद्र काळे, योगेश काळे, सुवर्णा जाधव, बाळासाहेब लंबे, बाळासाहेब साठे ,जयश्री जाधव, लक्ष्मण लव्हळे, हिरालाल देशमुख, दादा लंबे, बाळासाहेब लंबे, रणजीत चव्हाण आदी सह ग्रामस्थांनी रस्त्यावर खड्ड्यात भजन म्हणत खराब रस्त्याबद्दल ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्या ंचा निषेध करत भजन गाऊन निषेध नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!