Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या 17 वर्षानंतर भारताने टी 20 वर्ल्ड कप जिंकला कॅप्टन रोहित शर्माचा...

17 वर्षानंतर भारताने टी 20 वर्ल्ड कप जिंकला कॅप्टन रोहित शर्माचा टाटा बाय बाय

0
757

जामखेड न्युज——

17 वर्षानंतर भारताने टी 20 वर्ल्ड कप जिंकला

कॅप्टन रोहित शर्माचा टाटा बाय बाय

 

टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या धारदार गोलंदाजी आणि अफलातून फिल्डिंगच्या जोरावर मॅच फिरवली. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 169 धावांवर रोखण्यात यश मिळवलं.

टीम इंडियाने यासह रोहित शर्माच्या नेतृत्वात टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. रोहित शर्माची कॅप्टन म्हणून पहिली आणि खेळाडू म्हणून दुसरी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफी ठरली. टीम इंडियाने आजपासून 17 वर्षांआधी 2007 साली पहिलाच टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. कॅप्टन रोहित शर्मा यानेही टी 20 क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.

टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयानंतर अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीने टी 20 क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे. कॅप्टन रोहित शर्मा यानेही टी 20 क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.


विराट कोहलीने विजयानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान बोलताना आपण क्रिकेटच्या या छोट्या फॉर्मेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाच्या खेळाडूंनी विजयाचा जल्लोष करायला सुरुवात केली. एकमेकांनी एकमेकांना गळाभेट देत अभिनंदन केलं. तेव्हा भारतीय खेळाडूंचा कंठ दाटून आला होता, डोळ्यात आनंदाश्रू होते. मात्र काही वेळाने रोहित शर्मानेही विराट पाठोपाठ टी 20i क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. विराट-रोहितसारखी अनुभवी आणि आजी माजी कर्णधारांची जोडी निवृत्त झाल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. मात्र आपले 2 लाडके खेळाडू वर्ल्ड कपसह निवृत्त होत असल्याचा आनंदही चाहत्यांना आहे. तसेच रोहित आणि विराटने अगदी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.


दरम्यान विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी टी 20 फॉर्मेटमधून निवृत्तीनंतर वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये खेळणार असल्याचं स्पष्ट केलं. विराट आणि रोहितच्या या निर्णयामुळे आता टी 2O क्रिकेटमध्ये आणखी नव्या आणि युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे. तसेच आता रोहितनंतर हार्दिक पंड्या पूर्णवेळ कर्णधार असल्याचंही निश्चित झालं आहे.

रोहित शर्माची टी20 कारकीर्द

दरम्यान रोहितने इंग्लंड विरुद्ध 19 सप्टेंबर 2007 रोजी टी 20 पदार्पण केलं होतं. रोहितने तिथपासून इथवर आतापर्यंत एकूण
159 सामन्यांमध्ये 140.89 च्या स्ट्राईक रेटने आणि 31.34च्या एव्हरेजने 4 हजार 231 धावा केल्या. रोहितने या दरम्यान 5 शतकं आणि 32 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच रोहितची 121 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. तर रोहितने एकमेव विकेटही घेतली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!