स्व. देवराव दिगांबर वराट काॅलेज ऑफ फार्मसी साकतचा निकाल 95 टक्के साक्षी लहाने प्रथम, भक्ती वाघमारे द्वितीय तर रेहान मनियार तृतीय

0
98

जामखेड न्युज ———

स्व. देवराव दिगांबर वराट काॅलेज ऑफ फार्मसी साकतचा निकाल 95 टक्के

साक्षी लहाने प्रथम, भक्ती वाघमारे द्वितीय तर रेहान मनियार तृतीय

संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या स्व. देवराव दिगांबर वराट कॉलेज ऑफ फार्मसी साकतचा प्रथम वर्षांचा निकाल 95 टक्के लागला आहे. संस्थेने ज्युनियर काॅलेज प्रमाणे आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. पहिल्याच वर्षी चांगला निकाल लागल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

फार्मसी काॅलेज चा प्रथम वर्षांचा निकाल 95 टक्के लागला आहे. यामध्ये लहाने साक्षी हिने 74.60 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर द्वितीय क्रमांक वाघमारे भक्ती 74.30 टक्के तर तृतीय क्रमांक मनियार रेहान याने 73.60 टक्के गुण मिळवून पटकावला आहे.

संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून श्री साकेश्वर सायन्स ज्युनियर कॉलेज साकत व जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोल्हेवाडी यानंतर आता फार्मसी च्या रूपाने नवीन कोर्सला सुरू झाल्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची संधी परिसरात उपलब्ध झाली आहे. आणि पहिल्याच वर्षाचा निकाल चांगला लागला आहे. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

साकत सारख्या दुर्गम भागात वराट बंधुंनी बारा वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून साकेश्वर सायन्स ज्युनियर कॉलेज व जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुरू केले आज मोठा वटवृक्ष निर्माण झाला आहे.यातच आता फार्मसी काॅलेजचे भर पडली आहे. हजारो विद्यार्थ्यांना या शिक्षण संस्थेमुळे फायदा होत आहे. ग्रामीण भागात व्यावसायिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे.

महाराष्ट्रातील अनेक मेडिकल व इंजिनिअरिंग काॅलेज मध्ये या संस्थेचे विद्यार्थी आहेत. संस्थेने आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हि संस्था आकर्षण ठरली आहे. आता फार्मसी च्या रूपाने नवीन कोर्स सुरू झाल्याने ग्रामीण भागात व्यावसायिक शिक्षणाचे द्वार उघडले आहे. वराट बंधू मुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचा मोठा फायदा होत आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरूण वराट, संस्थेचे सचिव व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, प्राचार्य गोरक्षनाथ बारगजे आदींसह अनेकांनी केले आहे. 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here