जामखेड न्युज——
जामखेड महाविद्यालयात “स्कूल कनेक्ट” कार्यशाळा संपन्न

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा च्या गुणवत्ता सुधार योजना व जामखेड महाविद्यालय जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने “स्कूल कनेक्ट (NEP कनेक्ट) नवीन शैक्षणिक धोरण 2020” संदर्भात एक दिवसीय कार्यशाळा मंगळवार दिनांक 25 जून 2024 रोजी पार पडली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची जागृती करण्यासाठी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थी व पालक यांच्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डोंगरे एम एल हे होते.नवीन शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबवण्यासाठी नेमके काय केले पाहिजे याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल असं मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत तज्ञ व्याख्याते म्हणून जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जरे एम. आर. यांनी आपल्या व्याख्यानात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे उद्दिष्टे स्पष्ट केले. ज्ञान कौशल्य आणि अनुभव या बाबींचा अंतर्भाव या नव्या धोरणात केलेला आहे. सर्व ज्ञान शाखा ज्ञानाच्या पातळीवर जवळ आणल्याने विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. असे स्पष्ट करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत विस्तृत विवेचन केले.

कार्यशाळेची सुरुवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गीताने झाली . या कार्यशाळेसाठी प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थी,पालक तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रा गाडेकर एस एन यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा भाकरे आर ए यांनी केले कार्यक्रम प्रसंगी कला विभागाचे प्रमुख प्रा फलके ए बी,श्रीगोंदा महाविद्यालयातील अर्थशास्त्र चे प्रा.सुदाम भुजबळ व विविध विभागाचे विभाग प्रमुख,शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचे समन्वयक प्रा डॉ जाधव जी एम यांनी आभार मानले.


