जामखेड न्युज——
नाशिक शिक्षक मतदारसंघात जामखेड तालुक्यात 95.82 टक्के मतदान
नाशिक शिक्षक मतदारसंघात आज मतदान झाले यात जामखेड तालुक्यात 95.82 टक्के मतदान झाले मतदान केंद्र जामखेड तहसील कार्यालयात होते. एकुण 335 मतदानापैकी 321 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
नाशिक शिक्षक मतदारसंघात एकुण 21 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी महायुतीचे उमेदवार किशोर दराडे, महाविकास आघाडीकडून ॲड. संदीप गुळवे तर अपक्ष विवेक कोल्हे असा तिरंगी सामना होईल अशी शक्यता आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघात नगर जिल्ह्यात एकूण 17 हजार 392 मतदार आहेत. त्यांची जिल्ह्यातील 20 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. नगर, संगमनेर येथे प्रत्येकी 3, राहता व कोपरगाव येथे प्रत्येकी 2 तर इतर सर्व तालुक्यातून प्रत्येकी 1 मतदान केंद्र होते. नाशिक विभागात एकूण 90 मतदान केंद्र होते. प्रत्येक मतदान केंद्रावरून ‘वेब कास्टिंग’ची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानासाठी प्रत्येक केंद्रावर 5 याप्रमाणे नगर जिल्ह्यात 100 वर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. क्षेत्रीय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या सर्वांना दोन वेळेला प्रशिक्षण दिले गेले होते.
मतदान वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी होती तर मतदान करताना ते प्राधान्यक्रमाने करावयाचे होते प्रत्येक मतदान केंद्रावर एक सूक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्यात आला होते. मतदान संपल्यानंतर जिल्ह्यातील सर्व मतपेट्या राहाता येथे संकलित करून त्यानंतर मतमोजणीसाठी नाशिकला रवाना केल्या जाणार आहेत. मतमोजणी 1 जुलैला अंबड (नाशिक) येथील एमआयडीसीच्या गोदामात होणार आहे.
21 पैकी 9 उमेदवार नगर जिल्ह्यातील
निवडणुकीच्या रिंगणात नगर जिल्ह्यातील भागवत गायकवाड (संगमनेर), अमृतराव उर्फ आप्पासाहेब शिंदे (नगर), भाऊसाहेब कचरे (नगर), विवेक कोल्हे (कोपरगाव), संदीप गुरूळे (कोपरगाव), सचिन झगडे (श्रीगोंदे), दिलीप डोंगरे (संगमनेर), डॉ. छगन पानसरे (शेवगाव), व रणजित बोठे (राहाता) असे एकूण 9 उमेदवार आहेत.
जामखेड तालुक्यात एकूण 335 पैकी 321 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला
यामध्ये 269 पैकी 259 पुरुष मतदारांनी तर 66 पैकी 62 महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला सुमारे 95.82 टक्के मतदान झाले
आहे.