जामखेड न्युज——
संभाजी ब्रिगेडचा प्रदेश उपाध्यक्ष आण्णा सावंत सह दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
नोकरीचे आमिष दाखवून केली पाच लाखाची फसवणूक, आगोदरही जामखेड पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल
माझी मंत्रालयात ओळख आहे. मी तुला आरोग्य विभागात कायमस्वरूपी सरकारी नोकरी लावून देतो असे म्हणत संभाजी ब्रिगेडचा प्रदेश उपाध्यक्ष आण्णा सावंत याच्या सह दोघा जणांनी नोकरीचे आमिष दाखवून पाच लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी आण्णा सावंत सह दोघांवर जामखेड पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी सौरभ विठ्ठल कदम रा. सदाफुले वस्ती जामखेड हा गेल्या तीन वर्षांपासून जामखेड ग्रामीण रुग्णालयात कंत्राटी पद्धतीवर डेटा आँफरेटर म्हणून काम करत आहेत. या दरम्यान आरोपी यासीन हुसेन शेख रा. नुराणी काँलनी यांच्या बरोबर झाली. ते मला म्हणायचे की, संभाजी ब्रिगेडचा प्रदेश उपाध्यक्ष आण्णा सावंत व विठ्ठल ज्ञानेश्वर सावंत यांची मंत्रालयात चांगली ओळख आहे.
तुला कायमस्वरूपी सरकारी नोकरी लावायची असेल तर तुला काही पैसे द्यावे लागतील यानंतर दोन चार दिवसांनी यासीन हुसेन शेख व श्रीकृष्ण उर्फ आण्णा सावंत हे मी बस स्टँन्ड जवळ थांबलेलो असताना माझ्या जवळ आले व म्हणाले की, तुझे कमी पैशात काम करतो. मात्र यासाठी पंधरा लाख रुपये लागतील पण तु आमच्या जवळचा आहे म्हणून सध्या तू पाच लाख रुपये दे व दहा लाख काम झाल्यावर दे तुला एका महिन्यात कायमस्वरूपी सरकारी नोकरी लावतो. असे म्हणून फिर्यादी कडून पाच लाख रुपये घेतले.
मात्र एक महिना होऊन देखील नोकरी चे काम झाले नाही त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपींना वेळोवेळी फोन केले मात्र त्यांनी फोन घेतले नाही यानंतर फिर्यादी आपल्या नातेवाईकांसह आण्णा सावंत याच्या घरी गेले तुम्हाला नोकरी साठी दिलेले पाच लाख रुपये परत द्या असे म्हणताच आरोपी आण्णा सावंत याने शिवीगाळ करत फिर्यादी च्या वडिलाच्या अंगावर धावून गेला व तुमचे पैसे परत देत नसतो. तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली.
फिर्यादी ची फसवणूक झालेली आहे असे लक्षात येताच फिर्यादी व नातेवाईक जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते पण जामखेड पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचे लक्षात येताच दि. २४ रोजी अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते. यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार जामखेड पोलीस स्टेशनला संभाजी ब्रिगेडचा प्रदेश उपाध्यक्ष आण्णा सावंत सह इतर दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी फरार झाले आहेत.
पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र सरोदे हे करत आहेत.