जामखेड न्युज——-
मी अर्ज भरतोय आपणही यावेच – किशोर दराडे
आपल्या सर्वांचा विश्वासाचा, हक्काचा आणि सहज उपलब्ध होणारा शिक्षक आमदार
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात २०१८ ते २०२४ या कार्यकाळात सेवा करण्याची आपण संधी दिली, या काळात असंख्य प्रश्न सोडवले अन असंख्य प्रश्नांना शासन दरबारी दिशा दिली आहे.
शिक्षण क्षेत्रातील प्रश्न न संपणारे आहेत. शिक्षकांचे प्रश्न नव्याने उभे राहत आहेत. या प्रश्नांना शासन दरबारी वाचा फोडून त्याची सोडवणूक करण्यासाठी पुन्हा एकदा आपला सेवक म्हणून मी काम करू इच्छितो.
आपल्या सर्वांचा विश्वासाचा, हक्काचा आणि सहज उपलब्ध होणारा शिक्षक आमदार म्हणून आपण कौतुक केले. आपले हेच प्रेम पुन्हा एकदा मला मिळेल हा विश्वास आहे.
नाशिक विभागातील शिक्षक बंधु-भगिनींच्या आग्रहाखातर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी माझा उमेदवारी अर्ज शुक्रवार, दि. ७ जून २०२४ रोजी दाखल करत आहेत.
ही निवडणूक शिक्षक बांधवांची आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या उपस्थितीत माझा उमेदवारी अर्ज दाखल करावा ही माझी नैतिक जबाबदारी समजतो. आपल्या या सेवकाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवर्जून उपस्थित राहून आशीर्वाद दयावे हि विनंती. आमदार किशोर दराडे यांनी केली आहे.
आमदार किशोर दराडे यांनी सहा वर्षातील उल्लेखनीय कामे
जोपर्यंत माझ्या समस्त शिक्षक बंधू भगिनींना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही तोपर्यंत मीही पेन्शन घेणार नाही
जुन्या पेन्शन साठी प्रतिकात्मक अंत्ययात्रा
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आमदार दराडेंचे १७ पासून उपोषण
माझी आमदारकी फक्त जुन्या पेन्शन साठी
|| माझा वचननामा |
होय… माझा प्रत्येक क्षण शिक्षक बंधू-भगिनींच्या आनंदासाठीच…!
२००५ पूर्वीच्या व नंतरच्या शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींना जुनी पेन्शन योजना मिळवून देईपर्यंत स्वस्थ बसणार नाही.
टप्पा अनुदानावरील शाळांना प्रचलित धोरणानुसार थेट शंभर टक्के अनुदान मिळवून देण्यासाठी लढणार.
शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करण्यासाठी आवाज उठविणार,
कॉर्पोरेट शाळा विधेयकाला विरोध करणार.
आदिवासी विकास विभाग अंतर्गत आश्रमशाळांच्या वेळेत बदल करण्यासाठी ठोस पाठपुरावा करणार.
स्वयं: अर्थसाहित व विनाअनुदान धोरण बंद करण्यासाठी आवाज उठवणार.
अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना सेवा वेतन संरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न करणार.
शिक्षक-शिक्षकेतर बांधवांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत तीव्र कायदा करण्यासाठी ठाम भूमिका घेणार.
शिक्षकांना अतिरिक्त ठरवणे, वर्क लोड वाढवणे, रात्र शाळा बंद करणे, यासारख्या अनेक अन्यायकारक गोष्टींना विरोध करणार.
विद्यार्थी निकष न लावता शाळा तेथे पूर्वीप्रमाणेच कला व क्रीडा शिक्षकांची नेमणूक करण्यासाठी प्रयत्नशील.
आदिवासी भागातील कार्यरत शिक्षकास एकस्तर वेतन श्रेणीचा लाभ मिळवून देणे.
पूर्वीप्रमाणे वेतनेत्तर अनुदान व शाळेला इमारत भाडे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.
प्रत्येक शाळेत लिपिक व सेवक ही शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे भरण्यास प्रयत्न करणे.
सर्व शिक्षक बांधवांना वैद्यकीय खर्चासाठी कॅशलेस योजना कार्यान्वित करण्यासाठी आवाज उठवणार.
नेट-सेट प्रभावित वरिष्ठ महाविद्यालयातील अध्यापकांना पदोन्नतीचे लाभ मिळवून देणे.
आय. टी. आय. शिक्षकांना मानधनाऐवजी अनुदानित तत्वांवर वेतनश्रेणीत मान्यता मिळवून देणे.
नवीन शाळा मान्यतेसाठी बृहत आराखडा तयार करणे.
इतर राज्याप्रमाणे महिलांना ४० वर्षे वयानंतर २ वर्षे पगारी संगोपन रजा मिळणेसाठी प्रयत्न करणे.
आश्वासन नव्हे, वचननामा घेऊन आलो आहे !
आपल्या अपेक्षापूर्तीचा नवा विश्वास घेवून आलो आहे || शिक्षक आमदार किशोर दराडे