जामखेड न्युज——-
आणखेरी देवी उच्च माध्यमिक विद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश
कला शाखेचा 100 टक्के निकाल तर विज्ञान शाखेचा 98.93 टक्के

शारदा शिक्षण प्रसारक संस्था संगमनेर संचलित,
श्री आणखेरी देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, फक्राबाद ता. जामखेड बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. कला शाखेचा 100 टक्के निकाल तर विज्ञान शाखेचा 98.93 टक्के निकाल लागला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

कला शाखेचा 100 टक्के निकाल लागला आहे तर विज्ञान शाखेचा निकाल 98.93 टक्के आहे. विज्ञान शाखेत 94 विद्यार्थी परीक्षेस बसले होते यापैकी 93 उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत.

प्रथम क्रमांक वारे वैशाली दिलीप 90.17 टक्के, द्वितीय क्रमांक रोमन राधा बाळू 88.83 टक्के,
तृतीय क्रमांक सुर्यवंशी राज संतोष 87.83 टक्के
चौधरी आशुतोष आण्णासाहेब 86.83 टक्के
पोळ आदित्य अनिल 86.00 टक्के,
इंगळे समृद्धी संजय 85.83 टक्के,
बारस्कर सार्थक शिवाजी 84.83 टक्के,
शिंगटे आरती नारायण 84.05 टक्के,
घेमाड विक्रांत विठ्ठल 83.83 टक्के
बिरंगळ आरती सोमनाथ 82.83 टक्के
मोहळकर वेदांती दिपक 81.83 टक्के
राऊत पुनम रामदास 78.83 टक्के
वरील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक सचिव गाडेकर (आप्पा ) आर जी, होते चेअरमन प्रविण गाडेकर, अध्यक्ष सुलोचना गाडेकर, कोशाध्यक्ष ज्योती क्षिसागर,
प्राचार्य कोपनर डी पी, स्थानिक स्कुल कमिटी अध्यक्ष राऊत विश्वनाथ ( भाऊ) तसेच सर्व संस्था प्रतिनिधी शिक्षक शिकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थ
यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये
घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल
जाहीर करण्यात आला आहे.यामध्ये आपल्या विद्यालयातील विज्ञान शाखेचा निकाल 98.93% लागला आहे तसेच कला शाखेचा निकाल 100% लागला आहे. इयत्ता बारावी परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.



