जामखेड न्युज ——-
बारावीच्या निकालात ल. ना. होशिंगचे घवघवीत यश
वाणिज्य शाखेचा 100 टक्के तर विज्ञान शाखेचा 98.60 टक्के निकाल
जामखेड तालुक्यातील शैक्षणिक दृष्ट्या अग्रगण्य असलेल्या ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. वाणिज्य शाखेचा 100 टक्के निकाल लागला आहे तर विज्ञान शाखेचा 98.60 टक्के निकाल लागला आहे तर कला शाखेचा 81.36 टक्के निकाल लागला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, पालकांनी केले आहे.
विज्ञान शाखेचा निकाल 98.60 टक्के निकाल लागला आहे. प्रथम क्रमांक शिंदे गौरी किसन 86.67 टक्के, द्वितीय क्रमांक राऊत प्रतिक्षा बाळू 86.17 टक्के, तृतीय क्रमांक गांधी तेजस बिपीनकुमार 84.83 टक्के गुण मिळाले आहेत.
वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक शिंदे अर्थव अमर 82.67 टक्के, द्वितीय क्रमांक डोंगरे शिवानी शिवकुमार 81.50 टक्के, तृतीय क्रमांक चव्हाण सचिन भागवत 79.17 टक्के
कला शाखेचा निकाल 81.36 टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक राऊत वैष्णवी शिवाजी 89.67 टक्के,
द्वितीय क्रमांक लोखंडे कोमल गुलाब 86.67 टक्के, तृतीय क्रमांक कसरे अभय सुखदेव 78.67 टक्के
अशा प्रकारे ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष उद्धव देशमुख, उपाध्यक्ष अरूण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपप्राचार्य पोपट जरे, उपमुख्याध्यापक बी. ए. पारखे, पर्यवेक्षक पी. टी. गायकवाड यांच्या सह पालकांनी अभिनंदन केले आहे.