जामखेड न्युज——
माजी उपप्राचार्य ज्ञानदेव कुंभार यांना पितृशोक
हभप तुकाराम महाराज कुंभार यांचे ९४ व्या वर्षी निधन
तालुक्यातील हभप तुकाराम महाराज कुंभार वय ९४ रा. सटवाई जवळका ता. जामखेड यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या साठ वर्षापासून ते अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्या निधनाने अध्यात्मिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
हभप तुकाराम महाराज कुंभार हे कैकाडी महाराजांचे शिष्य होते. जामखेड, भूम, परांडा, करमाळा, बार्शी परिसरातील अनेक गावात त्यांनी अखंड हरिनाम सप्ताह सुरू केले तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह होत होते. परिसरात अध्यात्मिक वारसा निर्माण करण्याचे काम त्यांनी शेवटपर्यंत केले.
हभप तुकाराम महाराज कुंभार यांच्या मागे दोन मुले दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे. एक मुलगा शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत तर प्रा. ज्ञानदेव कुंभार हे जामखेड महाविद्यालय जामखेड येथे उपप्राचार्य होते तेही सेवानिवृत्त झाले आहेत.
ह.भ. प. तुकाराम महाराज कुंभार (वय वर्ष ९४ ) यांचे वृद्धापकाळाने आज गुरुवार दिनांक २३ मे रोजी सकाळी १०.३० वाजता दुःखद निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ठिक ५ वाजता अमरधाम, सटवाई जवळका येथे झाला जामखेड तालुका कुंभार समाजाच्या तसेच मित्र परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.