Friday, February 13, 2026
Home राजकारण डॉ. सुजय विखेंना खर्डा व जवळा जिल्हा परिषद गटातून सर्वाधिक मताधिक्य देणार...

डॉ. सुजय विखेंना खर्डा व जवळा जिल्हा परिषद गटातून सर्वाधिक मताधिक्य देणार – प्रा. सचिन गायवळ

0
706

जामखेड न्युज——

डॉ. सुजय विखेंना खर्डा व जवळा जिल्हा परिषद गटातून सर्वाधिक मताधिक्य देणार – प्रा. सचिन गायवळ

 

अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांचा विजय निश्चित असून माजी मंत्री आमदार प्राध्यापक राम शिंदे व आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या आदेशानुसार जामखेड तालुक्यासह खर्डा व जवळा जिल्हा परिषद गटातून खासदार सुजय दादा विखे पाटील यांना सर्वाधिक मताधिक्य देणार असल्याची माहिती सामायिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ यांनी जामखेड न्युजशी बोलताना दिली. 

जामखेड तालुक्यासह खर्डा व जवळा जिल्हा परिषद गटात प्रा. गायवळ यांचे खुप मोठे काम व जनसंपर्क आहे. त्यांना मानणारा वर्गही मोठा आहे. तरूण वर्गात त्यांची मोठी क्रेझ आहे. हे त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या वेळी दाखवून दिले आहे.

खर्डा जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीला एक नंबर असे लीड देऊन इतिहास घडवू अशी ग्वाही सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.

आपल्या जनसंपर्काच्या माध्यमातून गेल्या वर्षी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाच्या पॅनलला आसमान दाखवून ग्रामपंचायत मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे चार हि उमेदवार निवडून आणण्यात प्रा. सचिन गायवळ यांचा सिंहाचा वाटा होता.

विरोधकाच्या पॅनलचा ग्रामपंचायत मतदारसंघात धुवा उडविला होता आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चारही जागा भरघोस मताने निवडून आणून आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली होती त्याच पद्धतीने होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जामखेड तालुक्यातील खर्डा जिल्हा परिषद गटातील व जवळा जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावागावात जाऊन खासदार डॉ सुजय विखे पाटील यांना जास्तीत जास्त प्रत्येक बूथ वाईज मतदान आणि मताधिक्य देणार आहे.

सर्व युवक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन बैठका व गाठीभेटी सुरू असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!