Friday, February 13, 2026
Home राजकारण खर्डा पंचायत समिती गणातून खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना सर्वाधिक मताधिक्य...

खर्डा पंचायत समिती गणातून खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना सर्वाधिक मताधिक्य देणार – नंदुआबा गोरे

0
221

जामखेड न्युज——

खर्डा पंचायत समिती गणातून खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना सर्वाधिक मताधिक्य देणार – नंदुआबा गोरे

खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नामुळे कर्जत जामखेड मतदारसंचासह खर्डा पंचायत समिती गण व आपटी गावात कोट्यवधी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. याची उतराई परिसरातून डॉ. सुजय विखे पाटील यांना मोठे मताधिक्य देऊन करू असे जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व सरपंच नंदूआबा गोरे यांनी सांगितले.

आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या माध्यमातून खर्डा पंचायत समिती गणातून खासदार सुजय दादा विखे पाटील यांना भरघोस असे मताधिक्य देऊन विजय करण्याचा संकल्प जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा आपटी ग्रामपंचायतचे सरपंच नंदूआबा गोरे यांनी केला आहे.


यावेळी बाजार समितीचे संचालक म्हणाले की आमचे नेते माजी मंत्री आमदार प्रध्यापक राम शिंदे साहेब यांनी आपली पिंपळगाव आळवा या डांबरीकरण रस्त्यासाठी एक कोटीचा निधी देऊन या दोन-चार गावाच्या येण्या जाण्याचा रहदारीचा प्रश्न मिटवला आहे तसेच जगदाळे वस्ती ते आपटी या रस्त्यासाठी डांबरीकरणाला 92 लाख रुपयांचा निधी देऊन राऊत वस्ती या ठिकाणीही डांबरीकरणासाठी निधी देण्यात आला आहे तसेच आपटी परिसरातील अनेक गावांमध्ये आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला असून आज कामे सुरू आहेत.

आपटी येथील दत्त मंदिर यास या ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसवण्यासाठी 15 लक्ष रुपये देऊन मंदिराचे सुशोभीकरण झाले आहे तसेच आपटी गावांमध्ये अंतर्गत सिमेंट रस्त्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी दिला आहे तसेच जामखेड पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साठी वॉल कंपाऊंड बांधकामासाठी 14 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

तसेच दीनदुबळ्या गरीब दलित वस्ती मध्ये चार लाख रुपयांचे यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे तसेच या सर्व विविध विकास कामासाठी दिलेल्या कोट्यावेधीच्या निधीमुळे खासदार सुजय दादा विखे पाटील यांना जामखेड तालुक्यातील खर्डा गटातील खर्डा पंचायत समिती गणातून सर्वाधिक मताधिक्य देऊन विजय करण्याचा संकल्प बाजार समितीचे संचालक तथा सरपंच नंदू आबा गोरे यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!