Friday, February 13, 2026
Home राजकारण नरेंद्र मोदींनी जनतेच्या स्वप्नांचा चुराडा केला – शिवसेना आमदार भास्कर जाधव ...

नरेंद्र मोदींनी जनतेच्या स्वप्नांचा चुराडा केला – शिवसेना आमदार भास्कर जाधव निलेश लंकेला निवडून देण्याचे आवाहन

0
969

जामखेड न्युज——

नरेंद्र मोदींनी जनतेच्या स्वप्नांचा चुराडा केला – शिवसेना आमदार भास्कर जाधव

निलेश लंकेला निवडून देण्याचे आवाहन

 

नरेंद्र मोदींनी मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये जनतेला मोठ मोठी आश्वासने दिली होती. लोक मोदींच्या आश्वासनांच्या स्वप्नात होते. दहा वर्षांत या सर्व स्वप्नांचा चुराडा करत देशाला महागाई, बेरोजगारी च्या खाईत लोटले आहे. अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात विखेंच्या बलाढ्य शक्तीमुळे निलेश लंकेंची जनशक्ती भारी ठरणार आहे. निलेश लंके खासदार होणारच असा विश्वास शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके प्रचारार्थ जामखेड शहरात आज प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भुषणसिंह राजे होळकर, आमदार रोहित पवार, दादासाहेब मुंडे, कविताताई भाकरे, प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, शहरप्रमुख गणेश काळे, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, दत्ता वारे, राजेंद्र कोठारी, राजेंद्र पवार, संजय वराट, सुर्यकांत मोरे, कविताताई म्हात्रे, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, आपचे संतोष नवलाखा, काँग्रेसचे राहुल उगले, राजश्री मोरे, सरपंच अंजली ढेपे, नय्युम सुभेदार, प्रशांत राळेभात, साकतचे सरपंच हनुमंत पाटील, राजुरीचे सरपंच सागर कोल्हे, प्रविण उगले, अँड हर्षल डोके, अमित जाधव, मोहन पवार, शहाजीराजे भोसले, महेश राळेभात, प्रा. विकी घायतडक, कुंडल राळेभात, सुरेश भोसले, वैजीनाथ पोले, प्रकाश काळे यांच्या सह अनेक महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, निलेश लंके चा विजय लोकशाही व संविधानाचा विजय असणार आहे. मोदींकडे विकासाचा मुद्दा नाही म्हणून भावनिक मुद्दे पुढे करतात पुलवामा हल्ल्यात आपले 42 जवान नाहक मारले गेले. देशावर शोककळा असताना पंतप्रधान सिनेमात व्यस्त होते. आपणास भावनिक राजकारण करून दोन वेळा गंडवले आहे. आपले पक्ष फोडणाऱ्यांना जनता कदापी माफ करणार नाही मोदी सरकार चारशोपार नाही तर तडीपार होणार आहे.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, भाजपाने पवार कुटुंबियांना इडीचा त्रास दिला आपल्या बरोबर यावे म्हणून पण रोहित पवार घाबरले नाहीत सामना केला भाजपाने जीएसटीच्या रूपाने आपला खिसा कापला आहे. सगळ्या वस्तूवर जीएसटी लावला आहे. आतापर्यंत आपली भरपूर लूट केली आहे.भाजपाच्या काळात देश आराजकतेकडे चालला आहे. पंचवीस लाख कोटी रुपये उद्योगपतींची कर्जे माफ केली आहेत. पण सर्व सामान्य जनतेचे हाल होत आहेत

यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, विखे वर नाराज असणारे प्रा. राम शिंदे प्रवरेवरून खाऊ आल्यावर विखे चा प्रचार करू लागले. आमदार प्रा. राम शिंदे यांच्या माझ्या विरोधातील वक्तव्यास अजित दादांनी चूना लावला कोरोना काळात जनतेला धीर देण्याऐवजी शिंदे यांना बंगल्यातील झाडे महत्त्वाची वाटली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते माझ्या समोर उभेच राहू शकणार नाहीत. कारण माझे काम जनतेच्या ह्दयात आहे. त्यामुळे माझा पराभव त्यांना शक्य नाही.

यावेळी भुषणसिंह राजे होळकर म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमीत टँकर करावे लागतात हे दुर्दैव आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्याला फसवले आहे. आम्हाला फुकटचे राशन नको स्वाभीमानाची नोकरी हवी आहे. भाजपाची बेगडी भूमिका आहे. विकासाऐवजी धर्मावर निवडणूक नेतात रामाच्या नावावर मते मागतात विकास कामांवर मते मागावीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!