घोंगडीसाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील सर्वात मोठ्या देवदैठण येथील खंडोबा यात्रेला मोठ्या उत्साहात सुरूवात हजारो भाविकांच्या उपस्थितीत मानाच्या व नवसाच्या काठ्यांचा कार्यक्रम संपन्न

0
768

जामखेड न्युज——–

घोंगडीसाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील सर्वात मोठ्या देवदैठण येथील खंडोबा यात्रेला मोठ्या उत्साहात सुरूवात

हजारो भाविकांच्या उपस्थितीत मानाच्या व नवसाच्या काठ्यांचा कार्यक्रम संपन्न

 

जामखेड तालुक्यातील देवदैठण खंडोबा देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. संपूर्ण राज्यातून यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त हजेरी लावतात. घोंगडी साठी पंचक्रोशीत ही यात्रा प्रसिद्ध आहे. सध्या ग्रामस्थांच्या सहकार्याने मंदिर परिसराचा मोठ्या प्रमाणावर विकास सुरू आहे.

बुधवार दि. ८ रोजी नगर, बीड, धाराशिव या जिल्ह्यातून आलेल्या मानाच्या व नवसाच्या काठ्यांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी तांबाराजुरी, रत्नापूर, कासेवाडी, लोळदगांव, साबलखेड, जवळा, चिंचोडी पाटील, जेकटेवाडी, केळसांगवी, जवळका, तिंत्रज, शिरपूर, जवळाला, साकत या ठिकाणच्या नवसाच्या व मानाच्या काठ्यांचा कार्यक्रम असतो. मोठ्या उत्साहात मंदिराच्या समोर काठ्यांचा कार्यक्रम संपन्न झाला.


जवळपास पंधरा दिवस आगोदर म्हणजे २८ एप्रिल रोजी देवाला तेल लावून संध्याकाळी पालखी मिरवणूक काढुन यात्रेची सुरुवात होते. यानंतर चैत्र अमावश्या दिवशी महिला नगर प्रदक्षिणा दंडवत व तळी भंडार कार्यक्रम असतो. दुसऱ्या दिवशी दि. ८ रोजी मानाच्या काट्यांचा कार्यक्रम वाजत गाजत देवाला प्रदक्षिणा व कळस दर्शन कार्यक्रम असतो.दि. ९ रोजी भर यात्रा व खरेदी विक्री व प्रसिद्ध घोंगडी बाजार भरलेला असतो. दुसऱ्या दिवशी दि. १० रोजी रोजी देवाला पुरण पोळी नैवेद्य दाखवुन संध्याकाळी भव्य पालखीची मिरवणूक काढुन यात्रेची सांगता होते.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या गर्दीत व शांततेत यात्रेला सुरूवात झाली. आठ आणि नऊ तारखेला ह. भ. प. कैलास महाराज भोरे यांच्या प्रेरणेतून महाप्रसादाचे आयोजन केले. पहिल्या दिवशीचे अन्नदाते वडाचीवाडी (त.म.) येथील रावसाहेब एकनाथ भराटे यांनी महाप्रसादाची पंगत दिली व दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांच्या वतीने पंगत देण्यात येणार आहे. सर्व भाविक भक्त महाप्रसादचा आनंदाने स्वाद घेतात. त्याचप्रमाणे पहिल्या दिवशी आठ मे या दिवशी मानाच्या व नवसाच्या काट्यांचा कार्यक्रम शिस्ती मध्ये पार पडला प्रत्येक दिवशी हजारो भक्त दर्शनासाठी राज्यभरातून येतात.

गावकऱ्यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व पूर्ण भाविकांची दर्शनाची व्यवस्था याचे चोख नियोजन केलेले असते जामखेड तालुक्यामध्ये सर्वात मोठी यात्रा भरते ज्यामध्ये सर्व मिठाईचे दुकाने, खेळणी हॉटेल्स, ऊस रसाचे स्टॉल, थंड पेय, खेळणी याचबरोबर ही यात्रा खास करून घोंगडी साठी जास्त प्रसिद्ध असते बरेचसे भाविक घोंगडीची खरेदी जास्त करतात त्याचप्रमाणे ओरिजिनल हळकुंड हळद व प्रत्येक प्रकारचा खाऊ पंचक्रोशीतील सर्व गावातील भाविक भक्त घेऊन जातात. 

या यात्रेच्या माध्यमातून सर्व आप्तेष्ट नातेवाईक एकत्र येतात व एकमेकांच्या भेटी होतात पूर्ण महाराष्ट्रातून या यात्रेसाठी अनेक भक्तजन दर्शनाचा लाभ घेतात. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी गावातील सर्व आजी-माजी सैनिक, डाॅक्टर, नोकरदार कर्मचारी सर्व ग्रामस्थ व शिवनेरी अकॅडमी जामखेड येथील विद्यार्थी यांनी खूप चांगल्या प्रकारे आपले योगदान दिले कडक ऊन असल्यामुळे यात्रेकरूंची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक ठिकाणी पाण्याचे नियोजन गावकऱ्यांनी केले होते सर्व गावकऱ्यांच्या वतीने सर्व आलेल्या भाविक भक्तांचे स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here