खुशखबर!!!! मतदान करा आणि शितल कलेक्शनमध्ये खरेदीवर मिळवा पाच टक्के सवलत

0
437

जामखेड न्युज——

खुशखबर!!!!

मतदान करा आणि शितल कलेक्शनमध्ये खरेदीवर मिळवा पाच टक्के सवलत

लोकसभा निवडणूक 2024 साठीचे आत्तापर्यंत मतदानाचे तीन टप्पे पार पडले आहेत. आता चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. आता केवळ निवडणूक आयोगच नाही तर व्यापारी आणि जिल्हा प्रशासनानेही मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवीन मोहीम सुरू केली आहे. जामखेड शहरातील नामांकित असलेल्या शितल कलेक्शनने मतदारांसाठी मतदान केल्याची बेटावरील शाई दाखवा व कपडे खरेदीवर पाच टक्के सवलत मिळवा अशी खास सवलत जाहीर करण्यात आली आहे. या सवलतीचा जास्तीत जास्त मतदारांनी लाभ घ्यावा असे आवाहन शितल कलेक्शनच्या वतीने करण्यात आले आहे.


लोकसभा निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी निवडणूक आयोगासह विविध संस्था मतदारांना प्रोत्साहित करत आहेत. याच अनुषंगाने १३ मे होणाऱ्या मतदानाच्या दिवशी जो मतदार मतदान करतील त्या मतदारांसाठी जामखेड शहरातील नावाजलेल्या शितल कलेक्शन मध्ये खरेदीवर पाच टक्के सवलत देण्यात येणार आहे. अशी माहिती शितल कलेक्शनचे संचालक सागर अंदुरे यांनी दिली आहे.

आपला हक्क आपला अधिकार बनुया जागरूक आणि सुजाण मतदार मतदान करणे आणि मतदानाच्या साहाय्याने योग्य तो उमेदवार निवडणे ही आपली जबाबदारी आहे. म्हणून आपल्या उज्वल भवितव्यासाठी विचार पुर्वक मतदान करा, मतदान करून मतदानाची खुण दाखवा आणि शितल कलेक्शन मध्ये प्रत्येक खरेदीवर मिळवा पाच टक्के सुट लाँयल्टी प्रोग्राम 2 टक्के अतिरिक्त सवलत कालावधी 13 ते 15 मे पर्यंत आहे.

लोकशाहीचा उत्सव यशस्वी करण्यासाठी मतदानाचा टक्का वाढणे आवश्यक आहे यासाठी
शितल कलेक्शनने मतदारांना खरेदीवर पाच टक्के सवलत देत आकर्षित करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. या सुवर्ण संधीचा लाभ जास्तीत जास्त मतदारांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


देशात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. निवडणुकीच्या वातावरणात निवडणूक आयोगासह विविध संस्था अधिकाधिक मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करत आहेत. या प्रयत्नांमध्ये कंपन्या आणि व्यावसायिकही मागे नाहीत. जामखेड परिसरात शितल कलेक्शनने मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी आकर्षक सवलत जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here