जामखेड न्युज——
खर्डा येथील शेतकऱ्याचा मुलगा झाला स्टेट बँकेत अधिकारी
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शेतकरी बब्रुवान सुर्वे यांचा मुलगा अक्षय सुर्वे याने जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरदार घरच्या गरीब परिस्थितीवर मात करत स्पर्धा परीक्षेत यश मिळवत स्टेट बँकेत अधिकारी झाला आहे. यामुळे त्याच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
याबाबत माहिती अशी की, खर्डा येथील शेतकरी बब्रुवान सुर्वे यांचा मुलगा अक्षय सुर्वे हा प्रतिकूल परिस्थितीत वर मात करून नामांकित स्टेट बँक ऑफ इंडिया या अग्रगण्य बँकेमध्ये परिविक्षाधीन अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली आहे. त्यांचे खर्डा व परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.
अक्षय सुर्वे यांची शालेय शिक्षण खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा येथे पाचवी ते दहावीपर्यंत झाले. बारावीपर्यंतचे शिक्षण न्यू आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर या ठिकाणी झाले, त्या ठिकाणी त्यांनी उत्तम गुण मिळवून राजीव गांधी व तंत्रज्ञान परभणी येथील महाविद्यालयात अन्न व तंत्रज्ञान पदवी घेतली. त्यानंतर दिलेल्या परीक्षेत त्यांनी उत्तुंग यश मिळवत त्यांची स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये परिविक्षाधीन अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे.
जिद्द कष्ट व घरची बेताची परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अक्षयने सातत्याने अभ्यास करून हे यश संपादित केले आहे. अक्षयचा आदर्श इतर विद्यार्थांनी घेऊन जिद्द चिकाटी ठेवून यश संपादन करावे.
अक्षय सुर्वे यांचा खर्डा सेवा सोसायटी, वडार समाज संघटना यांनी सत्कार केला असून त्यांचे समाजातील सर्वच घटकांकडून कौतुक व त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. अक्षयचा आदर्श घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी यश मिळवावे.