पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांनी मांडलेल्या प्राचीन वृक्ष जतनाच्या प्रस्तावास मंजुरी

0
221
जामखेड न्युज – – – – 
             राज्यातील प्राचीन वृक्षांच्या संरक्षणासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी आवश्यक त्या सुधारणा करत विधेयक विधिमंडळ पटलावर मांडण्यात आले. या विधेयकात आवश्यक कृतिकार्यक्रम राबविण्याकरिता तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाची स्थापना देखील करण्यात आली आहे. महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) विधेयक, २०२१ हे विधेयक एकमताने सभागृहात मंजूर करण्यात आले. सुधारणा विधेयक प्रस्ताव ठेवल्यानंतर पर्यावरण आदित्य ठाकरे यांनी या विधेयकातील तपशील समोर मांडला, तसेच हा बदल करणे का आवश्यक आहे ?, हे पटवून दिले.
        “विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल होते. शास्वत विकास याकडे कुणीही लक्ष देत नाही. वातावरणातील बदल का होतात ?, याकडे आपण दुर्लक्ष करतो. यासाठी पाच मुद्दे समोर आणले आहेत. पहिले म्हणजे प्राचीन वृक्ष, विकासासाठी आपण जी झाडे कापत असतो, ती झाडे १५० ते २०० वर्षे जुनी असतात. गेल्या वर्षी आम्ही नॅशनल हायवे अॅथोरिटीकडे निवेदन करून सांगलीतील ४०० वर्षे जुने झाड वाचवले. रस्ता त्याच्या बाजूने नेला. या गोष्टी शक्य आहेत. या गोष्टी आपण करू शकतो. त्यामुळे त्याचे कायद्यामध्ये रुपांतर करणे गरजेचे आहे.” असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विधेयक मांडताना सांगितले.
      “झाडाचे वय कसे निश्चित करायचे यावर देखील तरतूद आणलेली आहे, जर विकासाआड येणारी झाडे कापण्याशिवाय पर्याय नसेल, तर त्याच्या वयाऐवढी झाडे लावण्याचे निश्चित केले आहे. २०० वय असेल, तर २०० झाडे लावली पाहिजेत. ३०० वय असेल, तर ३०० झाडे लावली पाहिजेत. तेही कमीत कमी सहा ते सात फुटांची झाडे लावणे आवश्यक आहे. ती झाडे पाच वर्षे कशी जगतील? याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. राजकीय दबावामुळे अनेक वेळा कुणालाही न विचारता झाडे कापली जातात, तसेच आमच्याकडे आरेचेही झाले. त्यासाठी आपण महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाची स्थापना करत आहोत. यात तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. या प्राधिकरणाकडे एखाद्या शहरात २०० हून अधिक झाडे कापायची असल्यास जावे लागेल. तसेच प्राचीन वृक्षांचा मुद्दाही या समितीकडे असणार आहे.”, हे मुद्दे या विधेयकात असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here