जामखेड न्युज——
“मराठा साम्राज्याचे चलन” राज्यस्तरीय एक दिवसीय कार्यशाळेत जामखेडचे नाणे संग्राहक पोपटलाल हळपावत यांचा गौरव
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक, वर्षानिमित्त दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन व इतिहास विभाग व के. टी. एच. एम् एम् महाविद्यालय, नाशिक, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मराठा साम्राज्याचे चलन” राज्यस्तरीय एक दिवसीय परिसंवादात दि. १७ मार्च २०२४ रोजीच्या कार्यक्रमात जेष्ठ, नाणे संग्राहक पोपटलाल हळपावत (मामा) जमखेड यांचा डॉ. दिलीप बळसेकर, संपादक व सचिव दर्शनिक विभाग, महाराष्ट्र शासन यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे उपजिल्हाधिकारी नाशिक अँड. नितीन ठाकरे यांचे उपस्थित सन्मान चिन्ह व सन्मान देउन करण्यात आला. यामुळे जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
पोपटनल हळपावत यांनी आपला व्यवसाय करतांना आपले छंद संग्रह कृतीतून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यापुढील ही छत्रपतींच्या चलनी शिवराई नाणी २५०० शिवराई संग्रहीत करुन त्यावर लेखन करायाचे कार्य चालू आहे.
तसेच आयुष्यभर संग्रहित दुबेळ्या दुर्मिळ वस्तू, गारगोटी, नाणी ॥ वस्तुचा संग्रह मुलाप्रमाणे जपला, वाढवला आहे हा संग्रह जास्तित जास्त इतिहास अभ्यासकांना व प्रेक्षकांना पाहता यावा या उदात्त हेतुने संपूर्ण संग्रह हळपावत व परीवाराने ” अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय या केंद्रास २०२१ मध्ये देणगी स्वरुपात भेट दिला आहे.
या त्यांच्या योगदानाची दखल दर्शनिक विभाग, महाराष्ट्र शासन व इतिहास विभाग व के. टी. एच. • एम् महाविद्याब्य नाशिक यांनी घेऊन हळपावत यांचा सत्कार करून गौरविण्यात आले.
प्रमुख उपस्थितीत जो प्रशांत सूर्यवंशी च आय, एम्र, आर टी कॉलेज, प्रा. आरती दरेकर (प्राचार्य , केटी. एच. ए महाविद्यालय, पुरुषोत्तम भागर्व, संशोधक ठाणे, इतिहास अभ्यासक विजय हिरण, नाणे अभ्यासक, चेतन राजापुरकर व अभ्यासक, प्राः अशुतोष पाटील, छत्रपती संभाजीनगर यांचेसह प्रेक्षकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.