जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील शिक्षण विभागाचे व शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद- आमदार रोहित पवार

गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचा शैक्षणिक विकास चांगल्या प्रकारे सुरू आहे. तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्व शिक्षक शिक्षकी पेक्षा न समजता एक व्रत समजून काम करत आहेत यामुळे गुणवत्ता सुधारली आहे.
आज जामखेड कर्जत तालुक्याचे भाग्यविधाते, लाड़के आमदार मा श्री रोहितदादा पवार यांनी नवभारत साक्षरता अभियान मुख्याध्यापक कार्यशाळा व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा बक्षीस विजेत्या शाळांच्या सत्कार सोहळा कार्यक्रमात उपस्थित राहून जामखेड तालुक्यात गटशिक्षणधिकारी श्री बाळासाहेब धनवे साहेब यांच्या कार्यकाळात एक शैक्षणिक क्रांती झाली आहे.

याचाच परिणाम म्हणून जि प प्रा शाळा सारोळा शाळेने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला.जि.प.प्राथ. शाळा सारोळा तालुक्यात प्रथम जि.प.प्राथ.शाळा नायगाव, द्वितीय शाळा मुंगेवाडी, तृतीय शाळा पोतेवाडी यांच्या सन्मान आ. रोहितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
आ.रोहित पवार म्हणाले की, तालुक्यातील सर्व शाळांना लवकरच शौचालयाचे युनिट देण्याचा माणस आहे. मिरजगाव व जामखेड शाळा युनिट एक मॅडेल करण्याचे काम चालू आहे. त्यानंतर तालुक्यातील 200 शाळा मॅडेल स्कूल तयार करण्याचा प्रयत्न आहे.

या सर्व शाळा जागतीक स्तरावर स्पर्धा करणाऱ्या शाळा असतील. शाळेतील मुलांना पॅड, इ लर्निग साहित्य, खाऊ वाटप ,खेळाचे साहित्य वाटप करण्याचा दृष्टीकोन स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील मुले कुठेही कमी पडू नयेत हाच आहे.रोहितदादा पवार यांनी आपल्या भाषणात सर्वच शिक्षणाच्या बाबीवर सविस्तर विवेचन केले. जुनी पेन्शनचा मुद्दाही घेतला. गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे साहेबांचे खूपच मनापासून कौतुक केले.

यावेळी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात गटशिक्षणधिकारी बाळासाहेब धनवे यांनी तालुक्यात हजर झाल्यापासून मेडिकल बिले मंजूरी, वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूरी, शिक्षण विभाग आपल्या दारी,आनंदी बाजार, क्रीड़ा स्पर्धा, विविध गुणदर्शन स्पर्धा, वाडी-वस्तीवरील शाळेने आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनामधून जमा झालेली लाखो रुपयांची लोकवर्गणी,तसेच नियमित शाळा भेटी दरम्यान उणिवा व गुणवंत शिक्षकांचे कौतुक इत्यादी बाबीतून शिक्षण क्षेत्रात उंचावलेल्या स्तराचा लेखाजोखा मांडला.

यावेळी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक श्री.अमोल राळेभात,कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, प्रशांत राळेभात,श्रीकांत लोखंडे,बाप्पू कार्ले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिक्षकांमधून श्री नारायण राऊत ,श्री एकनाथ चव्हाण,श्रीम.कामिनी राजगुरु मॅडम यांनी सर्वांनीच शिक्षण विभाग, शिक्षक आणि शाळा याबाबत धनवे साहेबांचा सकारात्मक दृष्टीकोन मांडला.जामखेड तालुक्याच्या परिवर्तनाच्या वाटेवरचा आलेख मांडला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मुकुंदराज सातपुते तर आभार श्री केशवराज कोल्हे यांनी मानले. एक उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे सर्व मुख्याध्यापकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.


