विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी जिल्हा परिषद झिक्री शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

0
399

जामखेड न्युज——

विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी जिल्हा परिषद झिक्री शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे

स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

 

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद झिक्री शाळा वेगवेगळ्या प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. दोन्ही महिला शिक्षिका छान काम करत आहेत असे गौरवोद्गार गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी झिक्री शाळेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात केले.


शाळेच्या शिक्षिका श्रीमती मंजिरी गाढवे मॅडम व महादेवी हुडगे मॅडम यांचे कौतुक जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर व शिक्षकांचे प्रेरणास्थान गटशिक्षणाधिकारी श्री.बाळासाहेब धनवे साहेब यांनी केले. दि.६/३/२०२४ रोजी जि.प. प्राथ.शाळा, झिक्री येथे डोळ्‌यांचे पारणे फिटेल असे स्नेहसंमेलन संपन्न झाले. कार्यक्रमाची रूपरेषा व शालेय गुणवत्तेचा चढता आलेखाची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मंजिरी रामचंद्र गाढवे मॅडम आपल्या प्रास्ताविकातून दिली.

यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीम.ज्योती बेल्हेकर मॅडम, केंद्रप्रमुख श्री. राम निकम, नगरसेवक श्री.दिगांबर चव्हाण, श्री.संतोष राऊत संचालक शिक्षक बँक, श्री.मुकुंदराज सातपुते विश्वस्त विकास मंडळ, शिक्षक नेते श्री.नारायण राऊत, श्री.अनिल अष्टेकर, श्री.संतोष डमाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

झिक्री गावच्या सरपंच सौ. नंदा दत्तात्रय साळुंके, माजी सरपंच श्री.सचिन साळुंके, श्री.आत्माराम सकट, श्री.भाऊसाहेब साळुंके अध्यक्ष शा.व्य. समिती, श्री.श्रीधर जिवडे, श्री.निलेश साळुंके, श्री.सचिन खैरे,सौ.हिना शेख, श्री.शौकत पठाण, श्री.सुभाष पवार व श्री.दिनकर डिसले मेजर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचे कौतूक करण्यासाठी तालुक्यातील श्री. किसन वराट सर, श्री.एकनाथ चव्हाण सर ,श्री.बाबासाहेब कुमटकर सर, श्री.नारायण लहाने सर ,श्री.नवनाथ बहिर सर, श्री.संतोष पवार सर, श्री.बाळासाहेब औटे सर,श्री. नाना मोरे सर, श्री.पावणे सर, श्री.मल्हारी पारखे सर,श्री.अतुल मुंजाळ सर,श्री.मुकुंद ढवळे साहेब,श्री.सुभाष नेटके सर, श्री.हनुमंत निंबाळकर सर, श्री.रजनीकांत साखरे सर, श्री.अशोक घोडेस्वार सर, श्री. विजयकुमार जाधव सर, श्री. उपेंद्र आढाव सर, श्री.गणेश शिंदे सर, श्री.किरण माने सर, श्री. द्रुपतराज डोके सर, श्री.अमोल सातपुते सर, श्री.बाळासाहेब जरांडे सर, श्री.महेश मोरे सर, श्री. गणेश रोडे सर, श्री.तात्या घुमरे सर, श्री.मडके सर, श्री.अर्जुन पवार सर, श्री.विठ्ठल पवार सर श्री शेंडकर सर, श्री . प्रशांत कुंभार सर, श्रीम.शिल्पा साखरे, श्रीम.अर्चना भोसले, श्रीम. स्मिता निंबाळकर ,श्रीम.शिवाली डुचे, श्रीम.राजश्री रुपनर, श्रीम.शमीम शेख, श्रीम. शितल काळे , श्रीम .ज्योती कावळे आदी शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.


कार्यक्रमासाठी सौ.अंजनाबाई इकडे, राधा पवळ व सौ.आशा सकट, श्री.अमृत कारंडे अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती बावी,श्री.अशोक निकम उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन बावी, श्री.मुरूमकर सर शिक्षण प्रेमी बावी, श्री.हनुमंत निकम महाराज सूत्रसंचालक बावी व श्री.गाढवे सर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.


शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवगीते, बडबडगीते,उखाणे आदी कार्यक्रम बहारदार शैलीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली

_यावेळी झिक्री गावातील पालक, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. *जिल्हास्तरीय आदर्श BLO पुरस्कार प्राप्त झाल्यावर बद्दल मान्यवरांच्या हस्ते श्री .रामचंद्र गाढवे सर यांचा सत्कार करण्यात आला.

बक्षीस रूपाने तब्बल 32200/- निधी संकलन झाले.

या कार्यक्रमाचे श्री.मनोजकुमार कांबळे सर व श्री.विजयकुमार जेधे सर यांनी बहारदार असे सुत्रसंचलन केले.शाळेच्या उपाध्यापिका सौ. महादेवी हुडगे मॅडम यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here