जामखेड न्युज——–
सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांचा शिक्षण विभागाच्या वतीने सन्मान
जामखेड तालुक्यातील परीक्षा काँपी मुक्त व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने तसेच खर्डा येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीसांनी खर्डा इंग्लिश स्कूल मध्ये बारावी व दहावी परीक्षा सुरळीत होत आहे. याबद्दल शिक्षण विभागाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
आज दहावीच्या हिंदीचा पेपर होता भरारी पथकातील सदस्य प्रा. युवराज भोसले, सुदाम वराट, कामिनी राजगुरू यांनी परीक्षा केंद्राला भेट दिली केंद्रावर पेपर भयमुक्त व काँपीमुक्त वातावरणात सुरू होता. बैठे पथकातील प्रमुख केशव गायकवाड केंद्र प्रमुख तेलंगशी/खर्डा शशिकांत वैद्य हेही बसून होते तसेच बारावी परीक्षेचे केंद्र संचालक तथा प्राचार्य सय्यद एम आय परीक्षा केंद्राचे उपकेंद्र संचालक श्री बालगुडे बी.बी. बिल्डिंग सुपरवायझर प्राध्यापक विधाते सर तसेच दहावी बोर्ड परीक्षेचे केंद्र संचालक श्री विधाते सर उपकेंद्र संचालक रवींद्र कोरे सर बाळकृष्ण देशमुख, सुपरवायझर कांतीलाल वसावे व विद्यालयाचे पर्यवेक्षक पाटील यांच्या सह शिपाई कर्मचारी उपस्थित होते.
आगोदर खर्डा परीक्षा केंद्र म्हणजे खुपच संवेदनशील होते. बाहेरून गावगुंड टपोऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव होता. यामुळे परीक्षार्थीं जीव मुठीत धरून पेपर लिहित होते. टपोरे मुले थेट वर्गात घुसखोरी करत होते. अनेक वेळा सुपरवायझर, केंद्र संचालक यांना दमबाजी करत होते. या सर्वांचा बंदोबस्त नुकतेच हजर झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी केला.
खर्डा परीक्षा केंद्राचे कारनामे झंजाड यांनी ऐकले त्यांनी शिक्षण विभाग विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांच्या बरोबर बैठक घेत बाहेरून कसलाही त्रास होऊ देणार नाही. बाहेरून त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करतो असे आश्वासन दिले आणि खरोखरच खर्डा परीक्षा केंद्र खुपच सुरळीत परीक्षा संपन्न होत आहे. यामुळे आज शिक्षण विभागाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बैठे पथकातील केंद्र प्रमुख केशव गायकवाड, भरारी पथकातील सदस्य प्रा. युवराज भोसले, सुदाम वराट, कामिनी राजगुरू, राठोड सर, पो.हे.कॉ.संभाजी शेंडे, पो.कॉ.शशिकांत म्हस्के उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्यातील सर्वच परीक्षा केंद्रावर दहावी बारावीची परीक्षा काँपीमुक्त व भयमुक्त वातावरण सुरू आहे. जामखेड मध्ये पोलीस निरीक्षक महेश पाटील व खर्डा येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या टीमचे सहकार्य खुपच महत्त्वाचे आहे.
खर्डा परीक्षा केंद्रातील शांतता भयमुक्त काँपीमुक्त वातावरणात संपन्न होत असलेली परीक्षा पाहून भरारी पथकातील सदस्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांचा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सन्मान केला.